Turkey Earthquake: टर्की सरकारने घातली Twitter वर बंदी; एलॉन मस्क म्हणाले... |twitter banned by turkish government due to public protests | Loksatta

Turkey Earthquake: भूकंपग्रस्त टर्कीत Twitter वर बंदी; एलॉन मस्क म्हणाले…

टर्कीमध्ये एकापाठोपाठ एक झालेल्या पाच भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झालीआहे.

Turkey ban twiiter
Turkey And Twitter Elon Musk – लोकसत्ता ग्राफिक्स टीम

टर्कीमध्ये एकापाठोपाठ एक झालेल्या पाच भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली असून शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या. या घटनेत आत्तापर्यंत १५ हजार नागरिकांचा मृत्यू झाला असून २० हजारांपेक्षा जास्त नागरीक जखमी झाले आहेत. आतापर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त जणांचा ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. टर्कीमध्ये झालेल्या भूकंपानंतर तेथील नागरिकांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सरकारविरोधात संताप वाढला आहे. त्यामुळे टर्की सरकारने देशात ट्विटरवर बंदी घातली आहे.

टब्लॉक्स इंटरनेट ऑब्झर्व्हेटरी ही कंपनी जगभरातील कनेक्टिव्हिटीचा आढावा घेत असते. याच कंपनीने टर्की सरकारने ट्विटरच्या सेवांवर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली होती. भूकंप झाल्यानंतर दोन दिवसांनी ट्विटरवर बंदी घालण्यात आल्याचे या कंपनीने सांगितले.

हेही वाचा : Video: Google ला मोठा झटका; नवीन एआय ‘Bard’ने केलेल्या ‘या’ चुकीमुळे गमावले १०० अब्ज डॉलर्स

मायक्रोब्लॉगिंग साईट असणाऱ्या ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी गुरुवारी केलेल्या ट्विटमध्ये लवकरच टर्कीमध्ये ट्विटरची सेवा सुरु करणार असल्याचे सांगितले. टर्की सरकारने ट्विटरला सांगितले आहे की, लवकरच ट्विटर देशात पुन्हा सुरु केले जाईल असे एलॉन मस्क म्हणाले.

सरकारविरोधात लोकांचा संताप

एकामागोमाग एक असे भूकंपाचे धक्के सहन करणाऱ्या टर्की देशात लोकांचा सरकारविवधतील संताप वाढत आहे. लोकांना मदत करण्यासाठी तेथील सरकार आवश्यक पाऊले उचलत नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे लोकांचा सरकारविरोधात रोष वाढत आहे. लोकांचा रोष बघता टर्की सरकारने ट्विटर आणि इंटरनेटवर बंदी घातली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 12:07 IST
Next Story
Twitter Blue ची होणार भारतामध्ये दमदार सुरुवात; ‘इतके’ पैसे देऊन घेता येणार सब्सक्रिप्शन