Twitter Blue Tick Verification Cost in India: नव्या बदलांनंतर ट्विटर ब्लु टिक व्हेरीफीकेशनसाठी किती किंमत मोजावी लागेल हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता होती. ट्विटर युजर याबाबतच्या नव्या अपडेटची वाट पाहत असतानाच ट्विटरकडुन ब्लु टिक व्हेरीफिकेशन आजपासून (१२ डिसेंबर २०२२) सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये ब्लु टिक व्हेरीफीकेशनसाठीच्या नव्या किंमती आणि नव्या फीचरबाबत माहिती देण्यात आली आहे.

ट्विटकडुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे, ज्यामध्ये ब्लु टिक संदर्भातील नव्या किंमती आणि फिचर्सबाबत माहिती देण्यात आली आहे. यामधील माहितीनुसार वेबसाठी ब्लु टिकची किंमत ८ डॉलर असेल, तर आयओएससाठी ११ डॉलर असेल.

The Best Place to Put Your Router For Strong Wi-Fi
WiFi Router: इंटरनेट खूपच स्लो चालतंय? वाय-फाय राउटरला ‘या’ ठिकाणी ठेवल्यास मिळेल सुपरफास्ट स्पीड
they were cheating people by mixing water in petrol people of jaipur exposed watch viral video
तुम्ही गाडीत पेट्रोलबरोबर पाणी तर भरत नाही ना! पाहा पेट्रोलपंपावरील घोटाळ्याचा धक्कादायक VIDEO
irctc indian railways black box of indian railway crew voice video recording system cvvrs installed in trains loco engine
रेल्वेगाड्यांमध्येही आता विमानासारखी ‘ब्लॅक बॉक्स’ यंत्रणा, अपघात रोखण्यासाठी होईल उपयोग; वाचा
how to make water funny viral video
एक ग्लास पाण्याची रेसिपी माहीत आहे का? हा व्हायरल Video पाहून जाणून घ्या; पोट धरून हसाल…

आणखी वाचा: Twitter: आता आतून असे दिसते ट्विटरचे मुख्यालय; Viral Photo पाहून तुम्हीही चकित व्हाल

एलॉन मस्क यांनी ट्विटरवर विविध रंगी टिक व्हेरीफीकेशन उपलब्ध असतील असे जाहिर केले होते, त्यानुसार आता ट्विटरवर सोनेरी आणि राखाडी चेकमार्क म्हणजेच व्हेरिफीकेशन टिक उपलब्ध असेल. अधिकृत अकाउंट्सना सोनेरी टिक मिळेल तर सरकारी संस्थांना ग्रे टिक मिळेल.

आणखी वाचा: १०० रुपयांच्या आतील जिओचे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन कोणते? जाणून घ्या किंमत आणि त्यावरील ऑफर

ब्लु टिक असणाऱ्या युजर्ससाठी विशेष फिचर्स उपलब्ध असतील. त्यांच्यासाठी ट्वीट एडिट करणे, १०८० पिक्सलचे व्हिडीओ अपलोड करणे, रीडर मोड अशे विशेष फिचर्स वापरता येणार आहेत.