scorecardresearch

Tech Layoffs: मोठी बातमी! एलॉन मस्ककडून Twitter मध्ये पुन्हा कर्मचाऱ्यांची कपात, जाणून घ्या

जगभरातील अनेक दिग्गज टेक कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत.

Elon musk twitter news
elon musk. (image credit -twitter)

सध्या जगभरात आर्थिक मंदीचे मोठे संकट आहे. यामुळे जगभरातील अनेक दिग्गज टेक कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. Apple, Microsoft , Amazon सह अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. काही कंपन्यांनी तर दोन वेळा हे पाउल उचलले आहे. यामध्ये आता Twitter कंपनीचा समावेश होणार आहे. कारण ट्विटरने पुन्हा एकदा आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

एका अहवालानुसार ट्विटर मधून शेकडो कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. ट्वीटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी यावेळी ट्विटरच्या दुसऱ्या टीममधून कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. ही कपात अशा वेळी करण्यात आली आहे की जेव्हा ट्विटरने भारतातील दोन ऑफिसेस बंद केली आहेत आणि त्यातील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे.

हेही वाचा : OlA EV Hub: ओला भारतात उभारणार जगातील सर्वात मोठे EV HUB: करणार ७,६१४ कोटींची गुतंवणूक, मिळणार ‘इतके’ रोजगार

एक रिपोर्टच्या माहितीनुसार एलॉन मस्कने ट्विटरच्या सेल्स अँड मार्केटिंग टीममधून कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. एक रिपोर्टच्या माहितीनुसार एलॉन मस्कने ट्विटरच्या सेल्स अँड मार्केटिंग टीममधून कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. किती लोकांना कामावरून काढले आहे याचा स्पष्ट आकडा समोर आला नसला तरी देखील ८०० कर्मचाऱ्यांना या कामावरून काढून टाकण्यात आल्याची शक्यता आहे.

अब्जाधीश एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून यामध्ये सातत्याने काही बदल घडून येत आहेत. कंपनीचे नुकसान भरून काढण्यासाठी आणि कंपनीमध्ये आर्थिक स्थिरता निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येत असल्याचे मस्क यांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 12:41 IST