एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय! Twitter वर १५ एप्रिलनंतर फक्त Verified युजर्सना मिळणार ‘या’ खास सुविधा

भारतासह जगभरामध्ये Twitter या अ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

For You Recommendations feature use only verified accounts
Elon Musk And Twitter- संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

Elon Musk यांनी ट्विटरची खरेदी केल्यापासून सातत्याने ते नवनवीन बदल कंपनीमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्विटर ही मायक्रोब्लॉगिंग सेवा पुरवणारी कंपनी आहे. भारतासह जगभरामध्ये या अ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी एलॉन मस्क यांनी या मल्टीनॅशनल कंपनीचे शेअर्स विकत घेतले आणि ट्विटरवर पूर्णपणे ताबा मिळवला. तेव्हापासून ट्विटर कंपनी खूप चर्चेत आहे. १ एप्रिल पासून जगभरात LegacyBlue बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ मस्क यांनी अजून एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. तो निर्णय काय आहे ते जाणून घेऊयात.

ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी जाहीर केले आहे की, १५ एप्रिलपासून केवळ जे अकाउंट व्हेरीफाईड आहे त्यांनाच ‘For You Recommendations’ या फीचरचा फायदा मिळणार आहे. याशिवाय ट्विटर पोलमध्ये सुद्धा ते वापरकर्ते वोट करू शकणार आहेत ज्यांचे अकाउंट हे व्हेरीफाईड आहेत.

एलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, १५ एप्रिलपासून फक्त व्हेरीफाईड अकाउंट्स असणारे वापरकर्तेच For You Recommendations या फीचरचा वापर करू शकणार आहेत. अत्यंत वेगाने विकसित होणाऱ्या AI Bot ला रोखण्यासाठी हा एकमात्र उपाय आहे. ट्विटरवर होणाऱ्या पोलसाठीसुधा व्हेरिफाइड अकाउंट असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Twitter चा सोर्स कोड झाला ऑनलाइन लीक; कंपनीचे संपूर्ण सोशल नेटवर्क धोक्यात

Twitter ने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. कंपनी लवकरच blue tick काढून टाकू शकते. एका सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ट्विटरने म्हटले आहे की, १ एप्रिलपासून जगभरात LegacyBlue बंद करण्यात येणार आहे. तसेच ट्विटरने व्हेरीफाईड अकाउंट्ससाठी जगभरामध्ये सब्स्क्रिप्शन मॉडेल सुरू केले आहे. ट्विटरने हे पाऊल उचलल्यामुळे वापरकर्त्यांना महिन्याला पैसे भरावे लागणार आहेत. सब्स्क्रिप्शन घेणाऱ्या वापरकर्त्यांना कंपनी काही खास फीचर्स देखील देणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 09:39 IST
Next Story
Twitter चा सोर्स कोड झाला ऑनलाइन लीक; कंपनीचे संपूर्ण सोशल नेटवर्क धोक्यात
Exit mobile version