सध्या ट्विटर खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ट्विट एडिटचे पर्याय दिले होते. याद्वारे युजरने केलेले ट्विट एडिट करता येऊ शकते. या फीचरची चाचणी सुरू आहे. अशात ट्विटरने पुन्हा एका नव्या फिचरची माहिती दिली आहे. या फीचरद्वारे तुम्हाला एकाच ट्विटमध्ये फोटो, व्हिडिओ, जीआयएफ फाईल जोडता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकाच ट्विटमध्ये अनेक मीडिया फाईल्स जोडण्याचा हा पर्याय पूर्वी नव्हता. व्हिडिओ, फोटो टाकण्यासाठी युजरला दोन वेगवेगळे ट्विट करावे लागत होते. मात्र, आता या फीचरने लोकांना एकाच ट्विटमध्ये विविध मीडिया फाईल्स टाकता येईल. ट्विटरने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. हे फीचर आयओएस आणि अँड्रॉइड दोन्हीवर उपलब्ध आहे. हे फीचर वापरण्यासाठी केवळ तुम्हाला ट्विटर अ‍ॅप अपडेट करावे लागले.

(लाँच पूर्वीच ONE PLUS BUD PRO 2 चे फीचर लिक, वायरलेस चार्जिंगसह ‘हे’ फीचर देणार स्पष्ट आवाज, जाणून घ्या..)

ट्विट कंपोजमधील फोटो आयकोन टॅप करून तुम्ही हा फीचर वापरू शकता, अशी माहिती ट्विटरने ट्विटद्वारे दिली आहे. तसेच ट्विटरने हा फीचर काढण्यामागचे कारण देखील स्पष्ट केले आहे. कधीकधी व्यक्तीमत्व दाखवण्यासाठी, आकर्षक संवादासाठी २८० शब्दांच्यापुढे जाण्याची गरज पडते, त्यामुळे हा पर्याय देण्यात आला आहे, असे ट्विटरने आपल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

एक आठड्यापूर्वी देखील ट्विटरने दोन नवे अपडेट दिले होते. युजरला व्हिडिओ शोधणे आणि पाहणे सोयिस्कर व्हावे यासाठी हे अपडेट होते. त्यामध्ये एक्सप्लोअर टॅबमध्ये नवीन व्हिडिओ कराउसेल आणि नवीन व्हिडिओ प्लेअर देण्यात आले होते.

(200 एमपी कॅमेरासह XIAOMI 12 T PRO लाँच, केवळ इतक्या मिनिटांत होणार चार्ज, 12 T मध्येही खास फीचर्स, जाणून घ्या किंमत)

असे वापरा फीचर

  • ट्विट कंपोजरमध्ये टेक्सट टाईप करा आणि नंतर फोटो आयकॉनवर टॅप करा.
  • ती मीडिया फाईल निवडा जी तुम्हाला पोस्ट करायची आहे. ही फाईल जीआयएफ, फोटो, व्हिडिओ असू शकते.
  • तुम्ही निवडलेल्या फाइल्स संख्येच्या आधारावर सोबत सोबत किंवा ग्रिड फॉरमॅटमध्ये दिसून येतील. त्यानंतर सेंड बटन क्लिक करा.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter new update allow user to add multiple types of media in single tweet ssb
First published on: 06-10-2022 at 15:56 IST