Twitter tips and tricks : इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर कंपनीत गोंधळाची अवस्था आहे. तरी देखील ट्विटर युजर्समध्ये लोकप्रिय आहे. माहिती प्रसारित करण्यासाठी ते उत्तम सोशल मीडिया प्लाटफॉर्म आहे. तुम्ही नियमित ट्विटर वापरत असाल, आपल्याबाबत चाहत्यांना रोज अपडेट देत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही ट्विटरसंबंधी ट्रिक्सबाबत माहिती देत आहोत जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

१) थ्रेडर अ‍ॅप

A unique wedding invitation card from Pune encouraged citizens to exercise their voting rights
लग्नपत्रिका नव्हे! या हटके पत्रिकेतून केली लोकांना मतदान करण्याची विनंती, एकदा क्लिक करून नीट पाहाच
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
how to choose career after 12th
बारावीची परीक्षा तर संपली, ‘मग आता पुढे काय?’ करिअर निवडण्याआधी ‘या’ गोष्टी पाहा…

अधिक ट्विट्स असेले ट्विटर थ्रेड हे अ‍ॅपच्या इंटरफेसवर वाचणे कठीण जाते. अशात थ्रेडर अ‍ॅप फायदेशीर ठरू शकते. हे अ‍ॅप लांब थ्रेड अनरोल करून त्यांना वाचण्यायोग्य फॉरमॅटमध्ये उपलब्ध करते. यासाठी अ‍ॅपचे ट्विटर हँडल टॅग करा आणि तुम्ही वाचू इच्छिता त्या थ्रेडला ‘अनरोल’ असे रिप्लाय द्या. नंतर अ‍ॅप बॉट आपोआप अनरोल थ्रेडसाठी लिंक पोस्ट करेल.

२) डार्क मोड

तुम्हाला ट्विटरची सवय झाली असेल तर स्क्रीनकडे टक लावून पाहणे आणि तुमच्या फीडमधून सतत स्क्रोल केल्याने तुमच्या डोळ्यांवर खूप ताण पडू शकतो. ट्विटर अ‍ॅपचे डार्क मोड या समस्येपासून आराम देण्यात मदत करू शकते. ट्विटर अ‍ॅप डार्कमोडमध्ये वापरण्यासाठी सर्वात आधी प्रोफाईल आयकनवर क्लिक करा. नंतर सेटिंग्स आणि सपोर्ट टॅब अंतर्गत सेटिंग्स अँड प्रायव्हसीवर क्लिक करा. त्यानंतर अक्सेसिबिलीटी, ‘डिस्प्ले अँड लँग्वेजेस’वर क्लिक करा. त्यानंतर ‘डिस्प्ले’मध्ये जा. यामध्ये तुम्हाला ‘डार्क मोड’ बटन दिसून येईल. या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डार्क मोड ऑन किंवा ऑफ करण्यासाठी टोगल मिळेल. तुम्ही डीम आणि लाइट्स आऊट पर्यायदेखील निवडू शकता.

३) लिस्ट वापरून तुमचे फीड व्यवस्थित करा

तुम्ही विविध खाती विविध कारणांमुळे फॉलो करत असाल, उदहारणार्थ तुम्ही विविध स्टँडअप कॉमेडियन्सना त्यांच्या जोक्ससाठी फॉलो करत असाल तर ट्विटरचे लिस्ट फीचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. लिस्ट फीचरद्वारे तुम्ही ही खाती वेगवेगळ्या सूचींमध्ये गटबद्ध करू शकाल. याद्वारे विविध माहिती लवकर कळेल.

ट्विटर अ‍ॅपवर लिस्ट तयार करण्यासाठी प्रोफाइल आयकनवर क्लिक करून लिस्ट बटनवर क्लिक करा. त्यानंतर, स्क्रीनच्या तळाशी उजवीकडे निळ्या चिन्हावर टॅप करा. येथे तुम्ही लिस्टचे नाव किंवा त्याबाबत माहिती जमा करू शकता. लिस्ट खाजगी असावी की पब्लिक तुम्ही हे देखील निवडू शकता. या नंतर तुम्ही लिस्टमध्ये अ‍ॅड करण्यासाठी ग्रुप निवडू शकता.

४) ट्विट्स परत रिट्विट करा

काहीवेळा ट्विट्सना आवश्यक तेवढी प्रतिक्रिया मिळत नाही. कदाचित निवडलेल्या वेळेमुळे असे होत असेल. पंरतु, चिंता करण्याचे कारण नाही. अधिक युजर्सना तुम्ही तुमचे ट्विट रिट्विट करून परत दाखवू शकता. यामुळे ट्विटचे आयुष्य वाढते. मात्र ट्विट करताना एक गोष्ठ लक्षात ठेवा. हे फीचर अधिकवेळा वापरू नका आणि जेव्हा वापराल तेव्हा रिट्विट केलेले ट्विट रेलेव्हेंट असावे याची खात्री करा.

५) सर्वोत्तम वेळी ट्विट करा

इतर मीडिया प्लाटफॉर्म्सप्रमाणे जेव्हा अधिक युजर्स ऑनलाइन असतात तेव्हा ट्विटरलाही ‘पीक हवर्स’ असतात आणि युजर्स कमी असतात तेव्हा ट्विटरलाही ‘ऑफ पीक’ युजर्स असतात. सोशल मॅनेजमेंट कंपनी हूटसूटनुसार, ट्विटरवर पोस्ट करण्याची सर्वोत्तम वेळ सोमवार आणि गुरुवारी सकाळी 8 वाजताची आहे. याचा अर्थ इतर दिवशी तुमची पोस्ट पाहण्यासाठी युजर्स नसतात असे नव्हे. मात्र या दिवासांमध्ये एंगेजमेंट अधिक मिळण्याची शक्यता असते.