मोठ्या शहरांमध्ये आपण एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बस, रिक्षा आणि कॅब चा वापर करतो. अनेकदा आपल्या गडबड असते आणि बस, रिक्षा किंवा कॅब वेळेत मिळत नाही. त्यामुळे आपल्याला फार त्रास सहन करावा लागतो. मात्र आता कॅबने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये UBER ने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. Uber आपल्या ग्राहकांसाठी एक खास फिचर घेऊन आले आहे.

उबर अ‍ॅपद्वारे वापरकर्ते आता ९० दिवस अगोदरच कॅब बुक करू शकणार आहेत. विशेषतः विमानतळावरून येण्या-जाण्यासाठी ज्यांना कॅबची आवश्यकता असते त्याने उबरचे नवीन फीचर जास्त उपयोगी ठरणार आहे. विमानतळ किंवा इतर कोणत्याही ठिकाणी कॅबची मागणी अधिक असणे हे साहजिकच आहे. कारण कधी-कधी टॅक्सीचे भाडे देखील नेहेमीपेक्षा जास्त असते. भाडे आणि मागणी वाढल्यामुळे प्रवाशांना Uber प्रीमियम किंवा Uber XL बुक करावे लागते. मात्र uber च्या नवीन फीचरमुळे वापरकर्त्यांना कॅब बुक करणे सोपे होणार आहे.

Why minimising or cutting out alcohol is one of the best fitness hacks
मद्यपान कमी करणे किंवा पूर्णपणे बंद करणे हेच आहे सर्वोत्तम आरोग्याचे रहस्य? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
Hyderabad woman in Jaguar attacks cop over wrong turn row video
जॅग्वार कार उलट्या बाजूनं चालवत पोलिसांवरच आरेरावी; शिवीगाळ करुन…संतापजनक VIDEO व्हायरल
High Court
अपंगांसाठीचे कायदे पुस्तकापुरते मर्यादित ठेवू नका, दृष्टीहीन महिलेला रेल्वेतील नोकरीबाबत दिलासा देताना उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
What should be carefully considered while taking a car loan
Money Mantra: वाहन कर्ज घेताना कोणत्या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावं ?

हेही वाचा : लाखो ग्राहकांचा डेटा लीक झाल्याच्या दाव्यावर HDFC बँकेचे स्पष्टीकरण; म्हणाले, “आमच्या सिस्टीममध्ये …”

एका ब्लॉग पोस्टमध्ये Uber ने म्हटले आहे की वापरकर्त्यांना कुठेही जाण्यास मदत करण्याचा कंपनीचा हेतू आहे. तुमचा विमानतळावरील अनुभव नेहमीपेक्षा चांगला आणि आनंददायी बनवण्यासाठी Uber Reserve हे नवीन फिचर आम्ही आणत आहोत. उबरच्या या नवीन फीचरबद्दल जाणून घेऊयात.

UberReserve द्वारे तुम्हाला ९० दिवस अगोदर कॅब बुक करता येणार आहे. म्हणजेच ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या फ्लाईटचे किंवा ट्रेनचे प्री-बुकिंग करता तसेच आता कॅबचे देखील बुकिंग तुम्हाला करता येणार आहे. तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय कॅब बुक करू शकता. कॅब बुक केल्यानंतर तुम्ही वापरकर्ते भाडे आणि ड्रॉयव्हरचे डिटेल्स पाहू शकणार आहेत. हे फिचर सध्या अमेरिका आणि कॅनडातील वापरकर्त्यांसाठी सुरु करण्यात आले आहे. लवकरच हे फिचर उर्वरित सर्व ग्राहकांसाठी सुरु करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Reliance Jio ने लॉन्च केली आणखी २७ शहरांमध्ये ५ जी सेवा; महाराष्ट्रातील ‘या’ शहरांचा आहे समावेश

विमानतळावरील गर्दीमध्ये तुम्हाला तुमची बुक केलेली कॅब शोधणे थोडे कठीण जाऊ शकते. या त्रासापासून वापरकर्त्यांना वाचवण्यासाठी Uber अ‍ॅप डायरेक्शन कनेक्ट करत आहे. हे फिचर तुम्हाला विमानतळाच्या गेटपासून Uber पिकअप लोकेशनपर्यंत जाण्यास मदत करेल. लवकरच हे फिचर बंगळुरू, हैद्राबाद आणि दिल्ली विमानतळावर सुरु करण्यात येणार आहे.