Unacademy करणार चौथ्यांदा कर्मचाऱ्यांची कपात; सीईओ म्हणाले, “सध्याची परिस्थिती…”

सध्या अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत.

Unacademy cuts job fourth round
Unacademy कंपनीमध्ये १२ टक्के कर्मचाऱ्यांची कपात होणार – (Image credit- Financial express)

सध्या अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. या कपातीची कंपन्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत आहेत. ed-tech स्टार्टअप कंपनी Unacademy नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी १२ टक्के म्हणजेच ३८० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

Unacademy चे सीईओ गौरव मुंजाळ यांनी याबाबत आपल्या कर्मचाऱ्यांना एक ईमेल केला आहे. या इमेलमध्ये ते म्हणतात की, नफा मिळविण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. दुर्दैवाने कंपनीची सध्याची परिस्थिती पाहता मला आणखी एक कठोर निर्णय घ्यावा लागेल.आम्ही आमच्या कंपनीतील १२ टक्के कर्मचारी कमी करू, ज्यामुळे आम्ही आमचे टार्गेट पूर्ण करू शकू व खर्च कमी करू शकतो असे या इमेलमध्ये म्हणण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त मनीकंट्रोल या वृत्तसंस्थेने दिले आहे.

हेही वाचा : Google ची एक चूक अन् भरावा लागणार १,३३८ कोटींचा दंड; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

मागच्या वर्षी कंपनीने ऑगस्टमध्ये कर्मचारी कपात केली होती. त्यावेळी कंपनीने १० टक्के म्हणजेच ३५० लोकांची कपात केली होती. मात्र त्यानंतर कंपनीने कर्मचाऱ्यांना काढणार नाही असे सांगितले होते. त्यादरम्यान कर्मचाऱ्यांना २ महिन्यांचा अ‍ॅडव्हान्स पगार देण्यात आला आणि एचआरकडून नोटीस देण्यात आली होती. Unacademy मध्ये कर्मचारी कपातीची ही चौथी फेरी असणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 15:16 IST
Next Story
पाकिस्तानविरुद्ध भारताने केली ‘ही’ मोठी कारवाई, काय आहे नेमके प्रकरण ?
Exit mobile version