Airtel, Reliance Jio या नामांकित टेलिकॉम कंपन्या ग्राहकांच्या विविध गरजा गरजा लक्षात घेऊन अनेक प्रीपेड प्लान्स ऑफर करतात. तुम्हीही स्वस्त आणि परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एअरटेलने अलीकडेच आपल्या १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये सुधारणा करून ग्राहकांसाठी बेस्ट डील ऑफर केली आहे. आता यापुढे एअरटेलचा १९९ रुपयांचा रिचार्ज अधिक वैधतेसह ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे तर दुसरीकडे रिलायन्स जिओने १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वैधता कमी असूनही फायदे अधिक देण्यात आले आहेत. एअरटेल व रिलायन्स जिओच्या प्लॅनमध्ये नेमका काय फरक आहे हे आपण सविस्तर पाहुयात..

Airtel १९९ रुपयांचा प्लॅन

एअरटेल इंडियाच्या १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण ३ जीबी डेटा उपलब्ध आहे. ३० दिवसांच्या वैधतेच्या या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल (एसटीडी व रोमिंग) तसेच ३० दिवसात ३०० एसएमएस करता येणार आहेत. यातील सुरुवातीचे १०० एसएमस मोफत असतील तर पुढील मॅसेजसाठी एसटीडी १ रुपया व रोमिंग मध्ये १.५ रुपया मोजावा लागणार आहे. याशिवाय एअरटेलच्या युजर्सना Wynk Music व Hellotunes चा फायदा मोफत घेता येणार आहे.

tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
How to improve Cibil score tips to increase
‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती

विश्लेषण: फक्त फोन नंबरवरून चोरलेल्या फोनचं ठिकाण सांगणारे ‘स्पाय अ‍ॅप’! अ‍ॅप निवडताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या?

रिलायन्स जिओ १९९ रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओ १९९ रुपयांचा प्लॅन हा २३ दिवसांच्या वैधतेसह येतो, यात ग्राहकांना दर दिवशी १.५ जीबी डेटा उपलब्ध करून देण्यात आला आहे म्हणजेच ग्राहकांना या प्रीपेड रिचार्जमध्ये २३ दिवसांसाठी ३४.५ जीबी डेटा वापरता येतो. दिवसभरीत डेटा लिमिट संपल्यास इंटरनेट स्पीड कमी करून ६४Kbps इतका होतो. जिओच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल व दिवसाला १०० एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाउड याचे सब्स्क्रिप्शन सुद्धा मोफत मिळते.