Upi apps transaction limit : यूपीआय अ‍ॅप्समुळे रोखरहित व्यवहार वाढला आहे. खरेदी करताना अनेक लोक आता कॅशऐवजी गुगल पे, फोन पे या सारख्या यूपीआय अ‍ॅपद्वारे व्यवहार करत आहेत. याचा फायदा म्हणजे, खिशात मोठी कॅश बाळगण्याची आता आवश्यकता नाही. तसेच, या अ‍ॅप्सवरून अमर्यादित व्यवहार करता येतात. मात्र, याला आता मर्यादा लागण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नॅशनेल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) थर्ड पार्टी यूपीआय अ‍ॅप पुरवठादारांसाठी (टीपीएपी) असलेल्या व्हॉल्यूम कॅपवर मर्यादा घालण्याची प्रसत्वावित ३१ डिसेंबरपर्यंतची अंतिम मुदत अंमलात आणण्याची शक्यता असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. असे झाल्यास देशातील नागरिकांना पोन पे, गुगल पे आणि इतर यूपीआय अ‍ॅप्सवरून अमर्यादित व्यवहार करणे अशक्य होणार आहे.

(पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! सुरू झाली JIO 5G सेवा; इतकी मिळणार इंटरनेट स्पीड)

सध्या गुगले पे आणि फोन पे हे दोन यूपीआय पेमेंट अ‍ॅप्स बाजारातील ८० टक्के वाट्यासह आघाडीवर आहेत. कोणत्याही यूपीआय अ‍ॅपची मक्तेदारी टाळण्यासाठी नोव्हेंबर २०२२ मध्ये ३० टक्के व्हॉल्यूम कॅपचा प्रस्ताव एनपीसीआयने पाठवला आहे. आरबीयाने तो मान्य करावा अशी एनपीसीआयची मागणी आहे. सध्या फोन पे, पेटीएम, गुगल पे आणि इतर यूपीआय अ‍ॅप्सवरून व्यवहारावर कुठलीही मर्यादा नाही. मात्र, प्रस्ताव मंजूर झाल्यास व्यवहारावर मर्यादा लागण्याची शक्यता आहे.

अहवालानुसार, प्रस्तावानंतरची सद्यस्थिती सर्वसमावेशकपणे समजून घेण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला एनपीसीआय, वित्त मंत्रालय आणि आरबीआयचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, असे अहवालात म्हटले आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

(FIFA : मजेदार होणार चर्चा, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये पाठवा फुटबॉल वर्ल्डकप स्टिकर्स आणि जीआयएफ, फॉलो करा ‘या’ स्टेप्स)

काही अहवालांनुसार, असे मानले जाते की, उद्योगातील भागधारकांनी एनसीपीआयला मुदत वाढवण्याची विनंती केली होती आणि सध्या त्याची तपासणी केली जात आहे. शिवाय, डिसेंबरच्या अखेरीस यूपीआय बाजार मर्यादा अंमलबजावणीचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unlimited transaction by upi payment apps may be limited ssb
First published on: 24-11-2022 at 14:01 IST