scorecardresearch

२००७ मधील ‘त्या’ iPhone ची चक्क ५२ लाखांमध्ये विक्री; असं काय आहे खास?, जाणून घ्या

जर तुम्ही अ‍ॅपल प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

iPhone 2007 sold at auction
iPhone 2007 -(Image: LCG Auctions)

Apple ही एक टेक कंपनी आहे. तसेच ही कंपनी iPhone चे उत्पादन करते. प्रत्येकाचे स्वप्न असते की आपण एकदातरी Apple कंपनीचा आयफोन वापरावा. जर तुम्ही अ‍ॅपल प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नुकत्याच झालेल्या एका लिलावामध्ये Apple च्या पहिल्या जनरेशनमधील iPhone ची रेकॉर्डब्रेक विक्री झाली आहे. हा फोन $६३,३५६ म्हणजेच सुमारे ५२ लाख रुपयांना विकला गेला आहे. २००७ मधील आयफोनसाठी ही आजपर्यंतची सर्वात मोठी लागलेली बोली आहे.

करेन ग्रीन या एक अमेरिकन टॅटू आर्टिस्ट आहेत. करेन ग्रीन या आपला फोन Doctors and Diva’s ‘Treasure Hunt Tuesday’ शो मध्ये घेऊन गेल्या होत्या. जिथे तज्ज्ञ डॉ. लॉरी यांनी त्याची किंमत $ ५००० डॉलर्स असण्याचा अंदाज व्यक्त केला होता. या शो मध्ये त्यांनी सांगितले की, तिने जेव्हा नवीन नोकरी सुरु केली होती तेव्हा हा फोन त्यांना त्यांच्या मित्रांनी भेट म्हणून दिला होता. मात्र त्यांनी नुकताच नवीन फोन खरेदी केल्यामुळे आयफोन कधीच उघडून पहिला नाही.

या आयफोनसाठी सुरुवातीची बोली ही $२,५०० डॉलर्स इतकी होती. करेन ग्रीनच्या मालकीचा असणारा ८ जीबी स्टोरेजचा फोनला लिलावात सुरुवातीला ५०,००० डॉलर्स मिळण्याची अपेक्षा होती. मात्र २७ बोली लागल्यानंतर त्याची किंमत $599 या मूळ किंमतीपेक्षा १६ पटीने वाढली आहे.

हेही वाचा : IPL 2023: क्रिकेट चाहत्यांसाठी खुषखबर! IPL सामन्यांचा आनंद आता मोफत लुटता येणार

न्यू जर्सी कॉस्मेटिक टॅटू आर्टिस्ट कॅरेन ग्रीनने बिझनेसइनसाइडरला सांगितले की तिला आयफोन भेट म्हणून देण्यात आला होता. परंतु तिने हा फोन कधीच वापरला नाही. कारण ती एका व्हेरिझॉन कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकली होती जे तिला आयफोन वापरण्यासाठी परवानगी देत नव्हती. २००७ मध्ये पहिल्या जनरेशनमधील आयफोन हा सुमारे ४०,००० अमेरिकी डॉलर्स मध्ये विकला गेल्याचे समजताच त्यांनी सीलबंद युनिटचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला.काही वर्षानंतर त्यांना सांगण्यात आले की हा फोन कलेक्टरला जास्त किंमतीला विकला जाऊ शकतो. जास्त किंमत मिळू शकते हे माहिती असूनही त्यांनी फोन आपल्याजवळच ठेवण्याचा निर्णय घेतला.

पहिला आयफोन हा अनधिकृतपणे Phone 1 किंवा iPhone 2G म्हणून ओळखला जातो. हा फोन ४ जीबी , ८ जीबी आणि १६ जीबी स्ट्रोइज असणाऱ्या व्हेरिएंटमध्ये येतो. नवीन iPhone हा ६ जीबी रॅम आणि १ टीबीपर्यंत स्टोरेज ऑफर करतो. आताच्या फोनमध्ये कॅमेरासुद्धा २ मेगापिक्सलवरून ४८ मेगापिक्सल इतका वाढवण्यात आला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 19:17 IST