डिजिटल युगात बहुतेक लोक UPI द्वारे व्यवहार करतात. ऑनलाइन पेमेंटमुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जर तुमच्याकडे रोख रक्कम नसेल पण तुमच्या स्मार्टफोनमध्ये UPI असेल तर तुमच्यासाठी काहीही खरेदी करणे सोपे होईल. असं देखील होतं की पेमेंट करताना, तुमचा UPI ट्रान्झॅक्शन फेल होतं किंवा तो बराच काळ पेंडिंग दाखवतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याचे एक कारण हे देखील असू शकते की UPI वरून पेमेंटची दैनिक मर्यादा असू शकते. UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी अनेक अॅप्स, बँका आणि विविध कॉम्बिनेशन आहेत. PhonePe आणि GPay सारख्या नॉन-बँकिंग अॅप्सद्वारे पेमेंट करताना तुम्हाला फेल ट्रान्झॅक्शनला सामोरे जावे लागू शकते. यासोबतच यामध्ये रोजच्या पेमेंटचीही मर्यादा असू शकते.

मर्यादा दररोज किंवा महिन्यानुसार असू शकते
तुम्ही किती पैसे पाठवू किंवा मिळवू शकता यावर दैनंदिन आणि मासिक मर्यादा आहेत. तुम्ही वापरत असलेल्या अॅपसाठी, UPI किंवा तुमच्या बँकेसाठी मर्यादा बदलू शकतात.

समस्येचे निराकरण कसे करावे
जर तुम्हाला जास्त पैशाचे व्यवहार करायचे असतील तर तुम्ही दुसऱ्या दिवसाची वाट पाहू शकता.
परंतु जर तुम्हाला कमी रक्कम भरायची असेल तर तुम्ही विनंती करू शकता.

आणखी वाचा : MI Fan Festival 2022: Xiaomi स्मार्टफोनवर १६,००० रुपयांपर्यंत सूट, टीव्ही आणि लॅपटॉपवर २९,००० रुपयांपर्यंत सूट

व्यवहार मर्यादा गाठल्यावर काय करावे ते जाणून घ्या
तुमचे दैनंदिन व्यवहार UPI लिमिटपेक्षा कमी असल्यास आणि तरीही तुम्हाला समस्या येत असल्यास, तुम्ही वेगळे बँक खाते वापरू शकता. ते खाते वापरून तुम्ही त्याच्या मर्यादेनुसार पैसे ट्रान्सफर करू शकता. व्यवहार अयशस्वी झाल्याबद्दल अधिक डिटेल्स आणि स्पष्टतेसाठी तुम्ही थेट तुमच्या बँकेशी संपर्क साधू शकता.

तुम्ही सपोर्ट टीमशी संपर्क साधू शकता
फसवणूक टाळण्यासाठी UPI अॅपद्वारे पेमेंट मर्यादा सेट केली जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला व्यवहारात समस्या येत असतील किंवा तुम्ही ती मर्यादा गाठली आहे असे वाटत असेल, तर तुम्ही जे काही UPI अॅप वापरत आहात त्याच्या सपोर्ट टीमशी संपर्क साधू शकता. कृपया लक्षात घ्या की UPI द्वारे १ रुपये पेक्षा कमी व्यवहार करता येणार नाहीत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upi payment problem if the transaction failed during upi payment know how to fix it prp
First published on: 07-04-2022 at 22:23 IST