युनायटेड स्टेट्समधील ओरेगॉन स्टेट विद्यापीठाने बनवलेल्या रोबोटने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. या रोबोटने २४.७३ सेकंदात १०० मीटर अंतर पार केले आहे. एक निवेदनातून, मेकनाइझ्ड स्प्रिंटर कासीने बायपेड रोबोटद्वारे केलेला वेगवान १०० मीटर डॅशचा विक्रम मोडला आहे. धावताना रोबट पडला नाही. ओएसयू व्हाईट ट्रॅक आणि फिल्ड सेंटरमध्ये कॅसिने हा विक्रम केल्याचे सांगण्यात आले आहे.

२०२१ मध्ये ५३ मिनिटांत ५ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले

या वर्षी मे महिन्यात ही शर्यत पार पडल्याचे सांगण्यात आले. रोबोटमध्ये कुठलेही कॅमेरे किंवा सेन्सर्स नव्हते. रोबोटला शहामृगासारखे वाकणारे गुडघे असल्याचे प्रसिद्धीपत्रकातून सांगण्यात आले आहे. कॅसीने यापूर्वी २०२१ मध्ये ५३ मिनिटांत ५ किलोमीटरचे अंतर धावत पूर्ण केले होते. ओरेगॉन स्टेट विद्यापीठातील रोबोटिक्सचे प्राध्यापक जोनाथन हर्स्ट यांच्या मार्गदर्शनाखाली हा रोबट बनवण्यात आल्याचे विद्यापीठाने सांगितले. @DanTilkinKOIN6 या ट्विटर युजरने या रोबोटचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

(व्हिवोने लाँच केला ‘हा’ 5 G फोल्डेबल फोन, सॅमसंगला तगडे आव्हान, जाणून घ्या किंमत)

या कार्यासाठी हे रोबोट महत्वाचे

गेल्या काही वर्षांपासून आम्ही या वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न करत होतो. लोकोमोशनसाठी रोबोट लर्निंगमध्ये संशोधन करण्यासाठी कॅसी हे महत्वाचे साधन आहे, असे जागतिक विक्रमासाठी नेतृत्व करणारा विद्यार्थी डेव्हिन क्रॉली याने सांगितले.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, नवा विक्रम करण्यासाठी काही अटी होत्या. रोबोटने शर्यतीच्या सुरुवातीला उभे राहून धावणे आणि नंतर अंतिम सीमारेषा ओलांडल्यानंतर उभे राहण्याच्याच स्थितीत असणे आवश्यक होते. तसेच, केवळ १०० मीटर धावणे आणि पडणे देखील अपेक्षित नव्हते. केलेला विक्रम हा रोबोट लोकोमोशनमध्ये मैलाचा दगड आहे, असे प्रसिद्धिपत्रकातून सागण्यात आले आहे.