आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन फीचर्समुळे अ‍ॅपलचे फोन ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. अलिकडे अ‍ॅपलच्या एसओएस सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फीचरने अलास्कामधील बर्फाळ प्रदेशात अडकलेल्या व्यक्तीला संकटातून बाहेर काढल्याचे समोर आले होते. यातून फोनमधील फीचर किती उपयुक्त ठरू शकतात हे दिसून येते. तुमच्याकडे आयफोन असेल तर त्यातील काही अनोखे फीचर्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यातीलच एक आहे लाइट डिटेक्शन अँड रेजिंग (LIDAR) फीचर. लाइट डिटेक्शन अँड रेजिंग स्कॅनरद्वारे तुम्ही कोणत्याही वस्तूचे मोजमाप करू शकता. काय आहे हे फीचर? जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लाइट डिटेक्शन अँड रेजिंग स्कॅनर रिअर कॅमेऱ्याच्या बाजूला असतो. हे फीचर आयफोनच्या कॅमेऱ्याचा वापर करून उंची मोजते. लाइट डिटेक्शन अँड रेजिंग युजरला पर्यावरण स्कॅन आणि मॅप करण्याची परवानगी देते. फीचर रडार सारखेच काम करते आणि केवळ अंतर आणि खोली मोजण्यासाठी लेजर वापरते.

(Vivo Y02 भारतात लाँच, 1TB पर्यंत वाढवू शकता इंटरनल स्टोअरेज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स)

सर्व आयफोनमध्ये हे फीचर मिळत नसून ते केवळ आयफोन १२, १३ आणि १४ प्रोमध्ये उपलब्ध आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही कधीही आणि कुठेही उंची मोजू शकता. हे फीचर मीजर अ‍ॅपद्वारे काम करते. आयफोनवर तुम्ही हे फीचर कसे वापरू शकता? याबाबत जाणून घेऊया.

  • सर्वात आधी आपल्या आयफोनवर मीजर अ‍ॅप उघडा.
  • आयफोनची पोजिशन बरोबर करा, जेणेकरून तुम्ही ज्या व्यक्तीचे मोजमाप करू इच्छिता ती व्यक्ती स्क्रिनवर डोक्यापासून पायापर्यंत दृश्यमान होईल.
  • आता व्यक्तीच्या डोक्यावर एक रेष दिसून येईल ज्यात रेषेच्या खाली उंचीचे माप दिसून येईल. छायाचित्र घेण्यासाठी पिक्चर बटनवर क्लिक करा.
  • फोटो सेव्ह करण्यासाठी तळाशी डाव्या कोपर्‍यातील स्क्रिनशॉटवर टॅप करा.
  • यानंतर ‘डन’वर टॅप करा आणि नंतर सेव्ह टू फाइल्स किंवा सेव्ह टू फोटोज निवडा.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use lidar feature in apple iphone to measure height ssb
First published on: 06-12-2022 at 13:30 IST