scorecardresearch

तुमचे गूगल अकाउंट सुरक्षित आहे का? ‘२ स्टेप व्हेरीफिकेशन’ प्रक्रिया काय आहे जाणून घ्या

‘२ स्टेप व्हेरीफिकेशन’ प्रक्रिया केल्याने तुमचे गूगल अकाउंट सुरक्षित होऊ शकते.

तुमचे गूगल अकाउंट सुरक्षित आहे का? ‘२ स्टेप व्हेरीफिकेशन’ प्रक्रिया काय आहे जाणून घ्या
प्रातिनिधिक फोटो

Google Security Tips : सायबर हल्ला हा आता चिंतेचा विषय झाला आहे. आपण पैशांचे बरेच व्यवहार ऑनलाईन करतो. त्यामुळे वेगवेगळ्या बँकांचे ॲप्स, ऑनलाईन पेमेंट ॲप्स यांना आपले बँकेचे खाते जोडलेले असते. अशात सायबर हल्ला होऊन आपल्या वैयक्तिक डेटासह बँक खात्याची माहिती आणि त्यातील रक्कम देखील गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी विविध टेक कंपन्यांकडून वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी सतत काही नवे अपडेट्स लाँच केले जातात. असाच एक अपडेट गूगलने जारी केला आहे.

गूगल या लोकप्रिय टेक कंपनीने २ फॅक्टर ऑथेंटिकेशन (2 Factor Authentication) किंवा २ स्टेप व्हेरिफिकेशन (2 Step Verification) हे अपडेट जारी केले आहे. हे फीचर ऑनलाईन अकाउंट्सच्या अतिरिक्त सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हे फीचर ९ नोव्हेंबर २०२१ रोजी स्वयंचलित पद्धतीने म्हणजे ऑटोमॅटिक सुरू करण्यात आले. याआधी गूगलने स्वयंचलित पद्धतीने वापरकर्त्यांना समाविष्ट केले जाईल अशी घोषणा केली होती. या फीचरचे महत्त्व काय आहे आणि हे फीचर कसे वापरायचे जाणून घ्या.

आणखी वाचा : फक्त १९७ रुपयांमध्ये १०० दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसह डेटाची सुविधा! कोणती कंपनी देतेय ही ऑफर जाणून घ्या

हे फीचर फक्त अशा खात्यांसाठी आहे ज्यांनी आधी २ स्टेप व्हेरिफिकेशनसाठी साइन अप केलेले नाही, अशी माहिती कंपनीकडुन देण्यात आली होती. गूगलने याबाबत सांगितले की योग्यरित्या कॉन्फिगर केलेल्या अकाउंटची स्वयंचलितपणे नोंदणी होईल. याचा अर्थ असा की ज्या अकाउंटमध्ये फोन नंबर किंवा रिकव्हरी ईमेल लिंक केलेले आहेत ते अकाउंट स्वयंचलितपणे (ऑटोमॅटिक) सुरक्षित केले जातील. वापरकर्ते त्यांच्या गूगल अकाउंट ची सिक्युरिटी चेकअप करून हे फीचर वापरात आहे की नाही याची खात्री करू शकतात.

‘२ स्टेप व्हेरिफिकेशन’ सुरू करण्याची प्रक्रिया

  • सर्वात आधी गूगल अकाउंट उघडा
  • नेवीगेशन पॅनलवर जाऊन सिक्युरिटी पर्याय निवडा.
  • गूगल साइन इन करून ‘२ स्टेप वेरिफिकेशन’ निवडा.
  • त्यापुढे येणारी ऑनस्क्रीन प्रक्रिया पूर्ण करा.

आणखी वाचा : मोबाईलमध्ये का असतो हा लहान होल? काय असते याचे महत्त्व जाणून घ्या

जर तुमचे गूगल अकाउंट ‘२ स्टेप व्हेरिफिकेशन’मध्ये समाविष्ट नसेल तर या प्रक्रियेद्वारे ते समाविष्ट होईल. यामुळे तुमचे गूगल अकाउंट तसेच इतर ऑनलाईन अकाउंट्‍स अधिक सुरक्षित होतील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या