World Photography Day : ‘या’ ट्रिक्स वापरून मोबाईलमध्ये काढा कॅमेरासारखे फोटो

मोबाईलमध्ये अधिक स्पष्ट आणि उत्तम फोटो काढण्यासाठी या ट्रिक्स नक्कीच उपयुक्त ठरतील.

World Photography Day : ‘या’ ट्रिक्स वापरून मोबाईलमध्ये काढा कॅमेरासारखे फोटो
प्रातिनिधिक फोटो

कोणताही क्षण लगेच कॅमेऱ्यात कैद करणे स्मार्टफोनमुळे सहज शक्य झाले आहे. सणसमारंभ, पार्टी किंवा ट्रिप या सगळ्यांचे आपण न चुकता मनसोक्त फोटो काढतो. त्यातही आपण काढलेला फोटो सर्वात चांगला असावा किंवा तो कॅमेऱ्यातील फोटोप्रमाणे दिसावा असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यासाठी फोटोवर विविध प्रकारचे फिल्टर वापरले जातात. पण ते फोटोमध्ये लगेच दिसून येतात. यासाठी आपल्या फोनचा कॅमेराच बेस्ट असावा असे आपल्याला वाटते. अशावेळी काही ट्रिक्स वापरून तुम्ही बेस्ट फोटो काढू शकता. कोणत्या आहेत त्या ट्रिक्स जाणून घ्या.

एकापेक्षा अधिक फोटो कॅप्चर करण्याचा पर्याय

आणखी वाचा – कोणी गुपचूप तुमचा कॉल रेकॉर्ड करतय का? ‘या’ ट्रिक्स वापरून लगेच ओळखा

एकापेक्षा अधिक फोटो कॅप्चर करता येणे हे स्मार्टफोन फोटोग्राफी मधील विशेष आकर्षण आहे.
हा पर्याय बहुतांश सर्व स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असतो. यामध्ये एकापेक्षा अधिक फोटो कॅप्चर करता येतात. फक्त एक बेस्ट शॉट निवडून तुम्ही ‘मल्टीपल फोटो कैप्चर’ हा ऑपशन निवडा त्यानंतर फोटो क्लिक करा. यामध्ये एकापेक्षा जास्त फोटो क्लिक केले जातील. त्यानंतर त्यामधला सर्वात चांगला फोटो निवडून तुम्ही उरलेले फोटो डिलिट करू शकता.

कॅमेरा फिचर्स समजून घ्या

तुमच्या फोनमध्ये आणि कॅमेरामध्ये कोणकोणते फीचर्स आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ काढून ते तपासावे लागेल. फोनमध्ये कॅमेरासाठी मॅन्युअल सेटिंग आहे का हे तपासा. तसे असल्यास मॅन्युअल सेटिंगमध्ये कलर बॅलेंस आणि शटर स्पीड सारखे पर्याय दिले जातात. ज्यामुळे उत्तम फोटो काढता येतात.

नैसर्गिक प्रकाशात फोटो काढा

काही मोजक्याच स्मार्टफोन्समध्ये इनडोर शॉट छान येतात. कारण स्मार्टफोनमध्ये छोटे सेन्सर असतात. तुम्हाला एखादा क्लोजअप शॉट घ्यायचा असेल तर नैसर्गिक प्रकाश हा उत्तम पर्याय आहे. यामुळे फोटो अधिक स्पष्ट येईल.

फोटो काढताना झूम करणे टाळा

डिजिटल झूम म्हणजेचं फोटो काढताना झूम करून फोटो काढणे टाळावे. कारण डिजिटल झूममुळे फोटो रिझोल्युशन कमी होते. ऑप्टिकल झूम वापरल्यास फोटोची कॉलिटी कमी होत नाही, त्यामुळे ते वापरण्यास हरकत नाही.

आणखी वाचा – मोबाईलमधला इंटरनेट डेटा लगेच संपतोय? ‘या’ ट्रिक्स वापरा नक्की होईल बचत

एचडीआर मोड

अतिप्रकाशातील फोटो तसेच अंधारातील फोटो असे दोन्ही प्रकारचे फोटो काढण्यास एचडीआर मोड मदत करते. यामध्ये प्रकाश बॅलन्स केला जातो. त्यामुळे तुमचे फोटो छान येतात. लँडस्केप फोटोग्राफीसाठी चांगला पर्याय आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Jio 5G असणार 4G पेक्षाही स्वस्त? जाणून घ्या, नव्या Tariff Planची अपेक्षित किंमत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी