मोबाईल भिजला तर काय करावे? लगेच वापरा 'या' टिप्स, फोन बिघडण्यापासून वाचवतील | Use this tips to fix your wet phone or if your mobile fell in water know more | Loksatta

मोबाईल भिजला तर काय करावे? लगेच वापरा ‘या’ टिप्स, फोन बिघडण्यापासून वाचवतील

अनेकवेळा पावसात फोन भिजण्याची शक्यता असते. अशावेळी काय करावे जाणून घ्या.

मोबाईल भिजला तर काय करावे? लगेच वापरा ‘या’ टिप्स, फोन बिघडण्यापासून वाचवतील
Photo : Pexels

मोबाईल हा आपली दैनंदिन कामं करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. अगदी किराणा सामान ऑर्डर करण्यापासून महिन्याची बीलं भरण्यापर्यंत आपण मोबाईलचा आधार घेतो. एका क्लिकवर सगळ्या गोष्टी आपल्यासमोर उघड करणाऱ्या या मित्राची काळजी घेणे पण तितकेच गरजेचे असते. प्रत्येक ठिकाणी सतत मोबाईल बघण्याचा काही जणांना जणू आजार झाला आहे असे वाटते. काहीजण तर बाथरूममध्येही फोन घेऊन जातात. पण अशावेळी फोन भिजण्याची शक्यता असते. अशावेळी किंवा कधी पावसात भिजल्यानंतर फोन बिघडण्यापासून कसा वाचवता येईल जाणून घ्या.

फोन भिजू नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, कारण फोन भिजल्यानंतर त्यामुळे आपली अनेक कामं अडुन राहू शकतात. यावरील एक उपाय म्हणजे काही वॉटरप्रूफ फोन लाँच झाले आहेत. पण त्यांची किंमत खूप जास्त असल्याने त्यांना फार कमी प्राधान्य दिले जाते.

आणखी वाचा : ऑनलाईन सेलमध्ये कंपन्यांना इतकी ऑफर देणे कसे परवडते? यातून नफा कसा कमावला जातो? जाणून घ्या

फोन भिजल्यावर करा या गोष्टी

  • पाण्यात भिजल्यानंतर फोन ऑन आहे का तपासा, जर फोन ऑन असेल तर लगेच ऑफ करा.
  • त्यानंतर फोनमधून सिमकार्ड आणि एसडी कार्ड काढून टाका.
  • आता फोन एखाद्या कपड्याने पुसून घ्या.
  • त्यानंतर फोनचा कव्हर काढून, फोन तांदुळ असलेल्या डब्यात २४ तासांसाठी ठेवा.
  • २४ तासांनंतर फोन ऑन होतोय की नाही चेक करा.
  • जर फोन ऑन झाला तर आधी फोनचा स्पीकर चेक करा. जर स्पीकर चांगला असेल तर याचा अर्थ फोन बिघडला नाही.
  • जर या स्टेप्स वापरल्यानंतरही फोन चालू नाही झाला तर लगेच प्रोफेशनल व्यक्तीकडुन फोन तपासून घ्या.
  • फोनला पाण्यापासून वाचवण्यासाठी वॉटर रेजिसस्टंट कव्हर देखील वापरू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
५६ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा मिळणार! जिओच्या स्वस्त रिचार्ज प्लॅन्सची किंमत जाणून घ्या

संबंधित बातम्या

विश्लेषण: ६ दिवसात १० लाख युजर्स, एलॉन मस्कने केलं कौतुक, गुगलपेक्षा अचूक उत्तर देणारं ChatGPT कसं करतं काम?
व्हिडीओकॉल सुरू असताना वापरता येणार दुसरे अ‍ॅप्स; काय आहे WhatsApp चे नवे फीचर जाणून घ्या
विश्लेषण: सायबर फसवणुकीतील रक्कम कशी वाचवावी? ‘गोल्डन अवर’ का महत्त्वाचा?
YOUTUBE TOP 10 यादी जाहीर, 2022 मध्ये ‘या’ व्हिडिओजना सर्वाधिक पसंती, कोणी पटकवले पहिले स्थान? पाहा
२ काय, ३ वेळा चार्ज होऊ शकतो फोन, ‘या’ ‘POWER BANKS’ची किंमत २ हजारांच्याही खाली, पाहा यादी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच येणार सीजन ३; अभिनेत्याने दिले संकेत
“सलमानच्या गाडीला…” अतरंगी ड्रेसमुळे धडपडणाऱ्या उर्फीला पाहून नेटकऱ्याची कमेंट
IND vs BAN: आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास! बांगलादेशने जिरवली आणि रोहित सेनेच्या खिशाला कात्री
‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेता सोशल मीडियावर मागतोय नोकरी; बायोडेटा शेअर करत म्हणाला…
तीन महिन्यांपूर्वी मावशीचं झालं निधन, अमृता खानविलकर भावूक होत म्हणाली, “कारण तिला मी…”