सध्या भारतात काही वर्षांपासून स्मार्टफोनचे मार्केट खूप वाढले आहे. अनेक कंपन्या आपले नवनवीन अस्मार्टफोन्सचे मॉडेल्स लाँच करत असतात. आजकाल स्मार्टफोन काळाची गरज बनली आहे. आपले काम पूर्णपणे स्मार्टफोनवर अवलंबून असते. काही अधिक फीचर्स असणारे स्मार्टफोन्स महागडे असतात त्यामुळे आपण ते खरेदी करू शकत नाही किंवा आपल्याला शक्य होत नाही. मात्र आज आपण बेस्ट फीचर्स असणारे स्मार्टफोन जे फक्त १५,००० रुपयांच्या आत तुम्ही खरेदी करू शकता हे जाणून घेऊयात.

Poco X4 Pro

Poco X4 Pro हा स्मार्टफोन तुम्ही १५,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुलएचडी प्लस एमओलईडी स्क्रीनचा डिस्प्ले येतो. ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा येतो. या फोनची बॅटरी ५,००० mAh क्षमतेची आहे. या फोनला ६७ वॅटचा चार्जिंग सपोर्ट मिळतो. Poco X4 Pro ब्ल्यू व ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. तसेच यामध्ये ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी इन्टर्वल स्टोरेज वापरायला मिळते. फ्लिपकार्टवर हा फोन १४,९९९ रुपयांना मिळत आहे.

IIFL Finance, selling shares, shareholders
आयआयएफएल फायनान्स हक्कभाग विक्रीद्वारे १,२७२ कोटी रुपये उभारणार
Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
A report by Michael Page India Salary Guidesuggests that an average salary increase of 20 percent is possible for senior executives in companies
उच्चाधिकाऱ्यांना चालू वर्षात २० टक्के वेतनवाढ शक्य; ‘मायकेल पेज इंडिया’चा अहवाल
IPO, financial year 2023-24, investments, companies, 62,000 crore,
‘आयपीओ’द्वारे २०२३-२४ मध्ये ६२,००० कोटींची निधी उभारणी

हेही वाचा : Coca Cola लवकरच लाँच करणार आपला पहिला स्मार्टफोन; जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Realme 9i 5G

Realme 9i 5G हा स्मार्टफोन गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लाँच झाला आहे. हा फोनediaTek Dimensity 810 चिपसेटचा येतो. यामध्ये ६.६ इंचाची आयपीएस एलसीडी स्क्रीन येते. यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे.तसेच या फोनची बॅटरी ५००० mAh क्षमतेची बॅटरी येते. गोल्ड , ब्लॅक आणि ब्ल्यू या रंगांमध्ये हा फोन फ्लिपकार्टवर १४,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. तसेच यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज येते.

Motorola G62

Motorola G62 हा स्मार्टफोन ५जी स्मार्टफोन आहे. यामध्ये ६.५५ इंचाचा फुलएचडी प्लस एलसीडी डिस्प्ले येतो. तसेच यात ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड लेन्स, २ मेगापिक्सलचा मॅक्रो आणि ५० मेगापिक्सलचा कॅमेरा येतो. मोटोरोला एक अँड्रॉइड अपग्रेड आणि तीन वर्षांच्या स्कियुरिटी अपडेट्स देदेणार आहे. यायची बॅटरी ही ५०००mAh क्षमतेची येते. ग्रे आणि ब्ल्यू या दोन रंगांमध्ये हा फोन १४,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. तसेच यामध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इन्टर्वल स्टोरेज येते.

हेही वाचा : लवकरच भारतात लाँच होणार 108 मेगापिक्सलचा जबरदस्त कॅमेरा असणारा Oppo चा ‘हा’ स्मार्टफोन

iQOO Z6 44W

iQOO Z6 44W या स्मार्टफोनमध्ये ६.४४ इंचाची एफएचडी प्लस AMOLED स्क्रीनयेते. हा फोन अँड्रॉइड १२ वर चालतो. यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा येतो. १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. यात फिंगरप्रिंट स्कॅनर मिळते. ४४ वॅटचे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. याची बॅटरी ५००० mAh क्षमतेची आहे. यात ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. हा फोन तुम्ही १४,९९९ रुपयांना खरेदी करू शकता.