Premium

iPhone मध्ये इन्स्टाग्राम रिल्स डाउनलोड करायची ‘ही’ आहे सोपी पद्धत; VIDEO एकदा पाहाच

How to Download Instagram Reels on iPhone with Music : इन्स्टाग्रामवर रिल्स पाहणे, हे अनेकांना आवडते. काही रिल्स इतके छान असतात की आपल्याला ते डाउललोड करावेसे वाटतात.

Download Instagram Reels on iPhone Without app
आयफोनवर इन्स्टाग्राम रील कसे डाउनलोड करावे (Image Credit- techy_marathi/Instagram)

How to Download Instagram Reels on iPhone: आजच्या काळात स्मार्टफोन ही प्रत्येकाची गरज बनली आहे.आपली अनेक कामे ही स्मार्टफोनच्या मदतीने पूर्ण होत असतात. डिजिटल पेमेंट करणे किंवा एकमेकांशी संवाद साधणे इत्यादी गोष्टींसाठी आपण सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. त्यामध्ये आपण फेसबुक, इन्स्टाग्राम, X (पूर्वीचे ट्विटर) आणि व्हॉट्सअ‍ॅपसह इत्यादी सोशल मीडिया वापरत असतो. इन्स्टाग्रामवर रिल्स पाहणे, हे अनेकांना आवडते. काही रिल्स इतके छान असतात की आपल्याला ते डाउललोड करावेसे वाटतात. जर तुमच्याकडे आयफोन असेल आणि तुम्हाला आयफोनमध्ये इन्स्टाग्रामवरील रिल्स डाउनलोड करता येत नसेल तर टेन्शन घेऊ नका. ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण इन्स्टाग्रामवरील रिल्स आयफोनमध्ये कशाप्रकारे डाउनलोड करता येतात ते पाहणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हल्ली अनेक जण इन्स्टाग्रामवर आपले रिल्स तयार करून पोस्ट करतात. त्यातून काही जण रिल्स स्टार म्हणून देखील प्रसिद्ध झाले आहेत. आपण दररोज थोडावेळ का होईना इन्स्टाग्रामवर रिल्स पाहत असतो. मात्र त्या रिल्स मधील एखादी रिल तुम्हाला आवडले तर तुम्ही ती सेव्ह करून शकता पण इन्स्टाग्राममध्ये डाउनलोड करू शकत नाही. सेव्ह केलेले रिल्स तुम्ही इन्स्टाग्रामच्या सेव्ह या पर्यायावर क्लिक करून पाहू शकता.

हेही वाचा : iPhone 14 स्वस्तात खरेदी करण्याची संधी; ‘या’ ठिकाणी मिळतोय ३५ हजारांचा डिस्काउंट

आयफोनमध्ये इन्स्टाग्राम रिल्स कसे डाउनलोड करायचे?

@ techy_marathi या इन्स्टाग्राम पेजवरील एका व्हिडिओमध्ये एक मुलगी व्हिडिओमधील मुलाला आयफोनमध्ये रिल्स कसे डाउनलोड करायचे असा प्रश्न विचारताना दिसत आहे. तेव्हा तो मुलगा सांगतो की जर का तुमच्याकडे आयफोन असेल आणि तुम्हाला रिल्स डाउनलोड करायचे असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला App स्टोअरमध्ये जावे लागेल. तिथे गेल्यानंतर Repost for posts, stories नावाचे अ‍ॅप्लिकेशन दिसेल. हे अ‍ॅप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे. हा व्हिडीओ @ techy_marathi या इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला आहे.

त्यानंतर ते अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्ही इन्स्टाग्राम ओपन करायचे आहे. नंतर तुम्हाला जे रील आवडले असेल ते रील सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर शेअर बटणावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तिथे कॉपी लिंक असा पर्याय तुम्हाला दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही आधी डाउनलोड केलेले Repost अ‍ॅप्लिकेशन ओपन करायचे आणि तिथे तुम्हाला ऑटोमेटिकली Allow पेस्ट असा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करायचे. तिथे तुम्ही सिलेक्ट केलेले रिल तुम्हाला दिसेल. शेअर बटण तुम्हाला प्रेस करायचे आहे. त्यानंतर सेव्ह बटणावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमचे रिल सेव्ह होईल. डाउनलोड केलेले रिल तुम्हाला तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये दिसेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Users how to download instagram reels on iphone check all details tmb 01

First published on: 21-09-2023 at 15:28 IST
Next Story
BSNL ने लॉन्च केले ‘हे’ दोन प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स; काय असणार खास?