प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या गोष्टींमध्ये आता चित्रपटांसोबतच ओटीटीचे नावही जोडले गेले आहे. आजच्या काळात, नेटफ्लिक्स (Netflix) आणि अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) सारख्या अनेक ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मची लोकप्रियता खूप वाढली आहे. आज आपण अशा काही टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेणार आहोत ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमचा नेटफ्लिक्स पाहण्याचा अनुभव अधिक चांगला करू शकता.

जर तुम्ही नेटफ्लिक्स वापरत असाल तर जाणून घ्या की नेटफ्लिक्सवर प्रोफाईल लॉक करण्याचा पर्याय देखील आहे. जर तुमच्या खात्यावर एकापेक्षा जास्त प्रोफाइल असल्यास, गोपनीयतेसाठी प्रोफाइल लॉक करणे हा एक चांगला पर्याय आहे. तुमचा चार अंकी पिन सेट करण्यासाठी, तुम्हाला वेबवर तुमचे नेटफ्लिक्स खाते उघडणे आवश्यक आहे.

विमानातही असतात हॉर्न्स; जाणून घ्या हे हॉर्न्स नेमके कधी आणि कशासाठी वापरतात

जर तुमच्या खात्यावर एकच प्रोफाईल असेल आणि तुमच्या व्यतिरिक्त इतर लोक ते वापरत असतील तर ही युक्ती तुमच्यासाठी चांगली ठरू शकते. तुम्ही काय पाहता हे तुम्ही इतर वापरकर्त्यांना सांगू इच्छित नसल्यास, तुम्ही वॉच लिस्टवर जाऊन पाहत असलेला भाग किंवा चित्रपट हटवू शकता.

जर तुमच्याकडे वायफाय कनेक्शन नसेल आणि तुम्ही तुमचे आवडते शो आणि चित्रपट स्ट्रीम करण्यासाठी मोबाइल डेटा वापरत असाल, तर नेटफ्लिक्सवर एक पर्याय देखील आहे ज्याद्वारे तुम्ही इंटरनेट वाचवू शकता. तुम्ही अ‍ॅप सेटिंग्जमध्ये जाऊन ‘सेव्ह डेटा’ हा पर्याय चालू केल्यास आणि नंतर मोबाइल डेटा वापरल्यास तुम्ही तुमचे इंटरनेट सेव्ह करू शकाल. या छोट्या युक्त्या तुमच्यासाठी नेटफ्लिक्स पाहणे आणखी मजेदार बनवू शकतात