scorecardresearch

Video: सर्च इंजिनचा Algorithm म्हणजे काय? ते कसे काम करतात?

इंटरनेटवरील सर्व सर्च इंजिने एका नियतरितीने (अल्गोरिदम) काम करत असतात.

google_logo_ap1
(फोटो: Reuters)

इंटरनेटवरील माहितीच्या अथांग ठेव्यामुळे काहीही ‘सर्च’ केले की लगेच सापडते, हा समज इतका बलवान झाला आहे की, शेजारच्या गल्लीतील दुकान शोधण्यासाठीही आपण हजारो मैलावर असलेल्या सर्च इंजिनच्या सर्व्हरना साद घालतो. पण तुम्हाला माहितेय का हे सर्च इंजिन नक्की कसं काम करतं?

इंटरनेटवरील सर्व सर्च इंजिने एका नियतरितीने (अल्गोरिदम) काम करत असतात. एखाद्या गोष्टीचा शोध घेत असताना हे अल्गोरिदम इंटरनेटवरील अक्राळविक्राळ माहितीचे पृथक्करण करून काही सेकंदात त्याचे परिणाम (रिझल्ट्स) तुमच्या स्क्रीनवर दर्शवत असतो. मात्र हा व्यवहार इतका साधा नसतो. याबद्दलच अधिक माहिती जाणून घ्या व्हिडीओच्या माध्यमातून…

थोडक्यात सांगायचे तर, वापरकर्ते शोध घेत असतानाच त्यांच्या माहितीचा वापर कसा करता येईल, याचा शोध सर्च अल्गोरिदम घेत असतात. डिजिटल माहिती आणि प्रक्रियेवर जागतिक स्तरावरील नियंत्रण नसल्याने याला लगाम बसणे सध्या तरी कठीण आहे.

(मूळ लेख: आसिफ बागवान)

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video what is search engine algorithm how do they work ttg

ताज्या बातम्या