Vivo ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन बाजारामध्ये लॅान्च करत असते. आतासुद्धा कंपनीने एक नवीन सिरिज बाजारामध्ये सादर केली आहे. विवोने Vivo S17 सिरिज लॅान्च केली आहे. या सिरीजमध्ये Vivo S17, Vivo S17t, आणि Vivo S17 Pro हे तीन स्मार्टफोन लॅान्च करण्यात आले आहेत. या सिरिजमधील स्मार्टफोनचे फीचर्स, त्यांची किंमत याबद्दल जाणून घेऊयात.
Vivo S17 चे फीचर्स
विवोच्या या सिरीजमधील तीनही स्मार्टफोन्समध्ये ६.७८ इंचाचा फूल HD AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. त्यामध्ये १२०Hz इतका रिफ्रेश रेट आणि २०.९ इतका आस्पेक्ट रेशो मिळतो. फोनमध्ये अँड्रॉइड १३ वर आधारित OriginOS 3 देण्यात आले आहे.Vivo S17 मध्ये Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसर देण्यात आला आहे. तर Vivo S17T मध्ये MediaTek Dimensity 8050 चिपसेट देण्यात आला आहे. तर Vivo S17 Pro मध्ये MediaTek Dimensity 8200 चिपसेट आहे. सिरिजमधील मोबाइलमध्ये १२ जीबी LPDDR4x रॅम आणि ५१२ जीबी पर्यंत UFS 3.1 इनबिल्ट स्टोरेजचा सपोर्ट मिळतो.




कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे विवो एस १७ सिरीजमध्ये ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. विवो एस १७ आणि विवो एस १७ टी व्हेरिएंटमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा युनिट आहे ज्यामध्ये OIS सह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि अल्ट्रा वाईड लेन्ससह ८ मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. विवो एस १७ प्रो मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. फोनमध्ये OIS सपोर्टसह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १२ मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स आणि ८ मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स मिळते. विवो एस १७ प्रो मध्ये मोठ्या रिंग फ्लॅश लाईटचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
विवो १७ सिरीजमधील तीनही फोनमध्ये ४,६०० mAh क्षमतेची बॅटरी आणि ८०W चे फ्लॅश चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. स्मार्टफोन हे यूएसबी टाईप-सी चार्जिंग पोर्ट आणि ऑडिओ जॅकसह येतात. सिक्युरिटीसाठी फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि AI फेस अनलॉक फिचर देण्यात आले आहे.
Vivo S17 मधील फोनची किंमत
Vivo S17 सिरीज Black, Mountain Sea Green, आणि Sea of Flowers या तीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. Vivo S17 12 आणि Vivo S17t या फोनला १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजसह लॉन्च करण्यात आले आहे. दोन्ही फोनची सुरुवातीची किंमत २,४९९ (२९,१०० रुपये ) चिनी युआन इतकी आहे. Vivo S17 Pro हा फोन Black, Mountain Sea Green आणि Ice White Jade या रंगांमध्ये सादर केला आहे. हा फोन देखील १२/५१२ जीबी मध्ये लॉन्च केला असून याची किंमत ३,०९९ (३६,१०० रुपये ) चिनी युआन इतकी आहे. हा स्मार्टफोन सध्या चीनमध्ये लॅान्चकरण्यात आला आहे.