Vivo ही एक मोबाईल उत्पादक कंपनी आहे. चायनीज कंपनी असणाऱ्या विवो कंपनीने आपला Vivo Y36 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन ४ जी आणि ५ जी या दोन्ही व्हर्जनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विवोने हा स्मार्टफोन ऑक्टाकोर Snapdragon 680 SoC सह लॉन्च केला आहे. या फोनच्या किंमतीबद्दल, फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Vivo Y36 चे फीचर्स

विवोच्या Vivo Y36 या स्मार्टफोनमध्ये ६.६४ इंचाचा फुल HD+ LCD डिस्प्ले मिळणार आहे. यामध्ये ९० Hz इतका रिफ्रेश रेट आणि ६५० नीट्स इतका पीक ब्राईटनेससह येतो. हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित FunTouch OS वर चालतो. यामध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.

हेही वाचा : CSK vs GT: आयपीएल २०२३ ची फायनल पाहण्यासाठी Jio आणि Airtel चे ५०० रुपयांच्या आतील ‘हे’ प्लॅन्स ठरू शकतात फायदेशीर, जाणून घ्या

या फोनचे स्टोरेज हे एक्सटर्नल एसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवता येते. यामध्ये ड्युअल नॅनो सिम स्लॉट देण्यात आला आहे. याच्या ड्युअल कॅमेरा रिअर सेटअपमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo Y36 मध्ये वापरकर्त्यांना ५००० mAh ची बॅटरी आणि त्याला ४४ W वायर्ड चार्जिंग सपोर्ट मिळतो. हा फोन १५ मिनिटांमध्ये ३० टक्के चार्ज होऊ शकतो असा कंपनीचा दावा आहे. तसेच सेफ्टीसाठी यामध्ये फोनच्या बाजूला फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी GPS, ब्लूटूथ v5.1, NFC आणि USB Type-C पोर्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत.

हेही वाचा : VIDEO: टेस्लाच्या आगमनाची शक्यता असतानाच Ola ने आपल्या ‘या’ प्रोजेक्टवर सुरू केले काम; सीईओ म्हणाले, “हा भारतातातील…”

काय आहे किंमत ?

सध्या कंपनीने हा फोन इंडोनेशियामध्ये लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन इंडोनेशियामध्ये IDR ३३,९९,००० (१८,७०० रुपये) मध्ये लॉन्च केला आहे. हा फोन ग्राहकांना Aqua Glitter आणि Meteor Black या रंगांमध्ये खरेदी करू शकतात. Vivo Y36 च्या ५जी सिरीजबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivo launch y 36 smartphone with 50 mp camera 5000 mah battery chech price and other features tmb 01
First published on: 27-05-2023 at 17:19 IST