Premium

विवोने लॉन्च केला Y78 5G स्मार्टफोन; ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि १६ जीबीसह मिळणार…, जाणून घ्या किंमत

विवोच्या या फोनमध्ये ६.७८ इंचाचा कर्व्ह एज OLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

vivo launch y78 5g in singapore and china
विवोने लॉन्च केला Y78 5G स्मार्टफोन (Image Credit- Financial Express)

Vivo एक मोबाईल कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन लॉन्च करत असते. विवो कंपनीने आपला Y78 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनमध्ये Dimensity 7020 प्रोसेसर आणि ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. विवो Y78 5G च्या फीचर्सबद्दल, किंमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Vivo Y78 5G चे फीचर्स

Vivo Y78 5G या फोनमध्ये वापरकर्त्यांना ६.७८ इंचाचा कर्व्ह एज OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रिझोल्युशन फुल एचडी प्लस आणि रिफ्रेस्ट रेट हा १२० Hz इतके आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा कोर Snapdragon 695 प्रोसेसरने समर्थित आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास यामद्ये ८ जीबी रॅम आणि ८ जीबीची व्हर्च्युअल रॅम देण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.

हेही वाचा : IPL 2023 Final: धोनी-जडेजाची जोडी ठरली सुपरहिट! JioCinema वर तब्बल ‘इतक्या’ कोटी प्रेक्षकांनी पाहिला सामना

तसेच यामध्ये २५६ जीबीचे इंटर्नल स्टोरेज देखील मिळते. हे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवले जाऊ शकते. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाल्यास याला ५,००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनला ४४ W चा चार्जिंग सपोर्ट मिळतो. हा फोन अँड्रॉइड १३ आधारित FunTouch OS 13 वर काम करतो.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास विवोच्या या फोनमध्ये OIS सपोर्टसह ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सिक्युरिटीसाठी यात फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

हेही वाचा : WhatsApp ने ‘या’ युजर्ससाठी रोलआऊट केले Status Archive फिचर, जाणून घ्या काय होणार फायदा

Vivo Y78 5G ची किंमत

विवोचा Y78 5G हा फोन Dreamy Gold आणि Flare Black या दोन रंगांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. हॅण्डसेटची विक्री अजून सुरू होयची आहे. फोनची किंमत देकील अद्याप कंपनीने जाहीर केलेली नाही.हा फोन सध्या सिंगापूरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन या महिन्याच्या सुरुवातीला चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. चीनमध्ये विवोच्या या फोनची किंमतअंदाजे ८/२५६ जीबीच्या व्हेरिएंटसाठी CNY १,६९९ (सुमारे २०,१०० रुपये), १२/२५६ जीबीच्या व्हेरिएंटसाठी CNY १,९९९ (सुमारे २३,७०० रुपये ) इतकी आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2023 at 17:41 IST
Next Story
Motorola च्या ‘या’ जबरदस्त फोनच्या सेलला आजपासून सुरूवात, ‘इतक्या’ रुपयांची मिळणार सूट