मोबाईल कंपनी विवोने भारतात Y21e नावाचा नवीन बजेट सेगमेंट स्मार्टफोन लॉन्च करत आपल्या Y सीरीजमध्ये भर पाडली आहे. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन ६८० मोबाइल प्लॅटफॉर्म आणि ५००० एमएएच बॅटरीद्वारे समर्थित आहे. Y21e मध्ये ६.५१ इंचाचा (HD + Halo Full View) डिस्प्ले आहे. विवो Y21e ला ६४ जीबी ROM आणि FunTouch OS १२ सह स्नॅपड्रॅग ६८० चिपसेट दिली आहे. Y21e मध्ये १८ वॅट फास्ट चार्ज तंत्रज्ञानासह ५००० एमएएच बॅटरी पॅक आहे. स्मार्टफोन रिव्हर्स चार्जिंगसह पॉवर बँक बनते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डिव्हाइसमध्ये १३ एमपी प्राथमिक सेन्सर आणि २ एमपी सुपर मायक्रो कॅमेरा आहे. यात पोर्ट्रेट मोड आणि सुपर एचडीआरसह विविध वैशिष्ट्ये आहेत. डिव्हाइसमध्ये समोरच्या बाजूला फेस ब्युटी मोडसह ८ एमपी सेल्फी कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, या फोनमध्ये 2.4GHz, 5GHz वायफाय, ब्लूटूथ 5.0, टाइप सी यूएसबी, जीपीएस, ओटीजी आणि एफएम इत्यादी बाबी आहेत. या फोनचे बॅक केस मटेरियल प्लास्टिकचे आहे आणि संपूर्ण स्मार्टफोनचे वजन १८२ ग्रॅम आहे. विवो Y21e चा ३ जीबी + ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट रुपये १२,९०० (एमआरपी रुपये १६,९९०) च्या किमतीत उपलब्ध असेल. स्मार्टफोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. यात मिडनाईट ब्लू आणि डायमंड ग्लो यांचा समावेश आहे. Y21e सह, तुम्हाला फोनच्या बॉक्समध्ये कागदपत्रे, टाइप-सी ते यूएसबी केबल, यूएसबी पॉवर अॅडॉप्टर, सिम इजेक्ट टूल, फोन केस आणि प्रोटेक्टीव्ह फिल्म (जे फोनवर प्री-इंस्टॉल केलेले असेल) मिळेल.

इंस्टाग्रामचा कंटाळा आलाय? आता मोबाईल अ‍ॅपमधूनच डिलीट करता येणार अकाउंट; नव्या फीचरच्या टेस्टिंगला सुरुवात

हा फोन खास का आहे?

  • विवोचा सध्याचा हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.
  • हा फोन पॉवर बँक म्हणूनही काम करेल.
  • रिव्हर्स चार्जिंग फीचरने स्मार्टवॉच आणि इअरफोन चार्ज करता येतात.
  • यात ब्लू लाइट फिल्टर फीचर असून डोळ्यांचे संरक्षण होतं.
  • अनलॉक करण्यासाठी फेस वेक वैशिष्ट्यासह येतो.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivo mobile launch y21e series smartphone rmt
First published on: 15-01-2022 at 12:46 IST