प्रिमियम दिसणारा आणि दमदार फिचर्ससह स्मार्टफोन तुम्‍ही शोधत असाल तर तुम्ही Vivo चा रंग बदलणारा स्मार्टफोन Vivo V23 5G चा विचार करू शकता. Vivo V23 5G च्या मागील पॅनलचा रंग बदलतो आणि त्याचे  स्पेसिफिकेशन्स सुद्धा पावरफुल आहेत. Vivo V23 5G मध्ये ४४ W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. Flipkart वरून हा Vivo फोन घेतल्यास तुम्हाला चांगली एक्सचेंज व्हॅल्यू देखील मिळेल. याशिवाय नो-कॉस्ट ईएमआय आणि बँक ऑफर देखील आहेत. आम्ही तुम्हाला Vivo V23 5G वरील सवलती आणि डीलबद्दल सर्व काही माहिती देत आहोत. जाणून घ्या सविस्तर…


vivo V23 5G: २९,९९० रुपयांपासून किंमत सुरू

Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Mumbai Metro Introduces Wristband Ticketing for Metro 1 Route No Need for Paper or Mobile Tickets
‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी आता मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकिट सेवा कार्यान्वित
bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता

Vivo V23 5G स्मार्टफोन Flipkart वर २९,९९०  रुपयांना लिस्ट झाला आहे. तुम्ही एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे हँडसेट खरेदी केल्यास, तुम्हाला १,५०० रुपयांची झटपट सूट मिळेल. याशिवाय Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास १० टक्के सूट (७५० रुपयांपर्यंत) मिळेल.

आणखी वाचा : Gmail मध्ये साइन इन होत नाही? तुमचं Account कसं कराल रिकव्हर, पाहा सोपी प्रोसेस


Flipkart Axis Bank वर देखील ब्रँड कार्डसह ५ टक्के सूट मिळेल. हा हँडसेट फ्लिपकार्टवरून ४,९९९ रुपये प्रति महिना नो-कॉस्ट EMI वर खरेदी केला जाऊ शकतो. या Vivo फोनवर १२,५०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील आहे. म्हणजेच जर तुम्ही पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यूमध्ये फोन खरेदी केला तर तुम्हाला १४,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. हँडसेट खरेदी केल्यावर, गाना प्लस सबस्क्रिप्शन ३ महिन्यांसाठी विनामूल्य उपलब्ध असेल.


Vivo V23 5G Specifications
या Vivo स्मार्टफोनचे सर्वात महत्त्वाचे फीचर्स म्हणजे त्याच्या मागील पॅनलचा रंग बदलणे. यात कलर-चेंजिंग ग्लास डिजाइन दिली आहे जी सूर्यप्रकाश आणि इतर कृत्रिम अतिनील लहरींच्या संपर्कात असताना वाइब्रेंट कलर रिफ्लेक्ट   करते. म्हणजेच, मागील पॅनेल वेगवेगळ्या रंगांवर प्रोसेस करते.
Vivo V23 5G स्मार्टफोनमध्ये ६.४४ इंच फुलएचडी + (१०८०×२,४०० पिक्सेल) AMOLED डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 920 प्रोसेसर उपलब्ध आहे. हँडसेटमध्ये ८ जीबी रॅम आणि १२ जीबी रॅमसह १२८ जीबी आणि २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय आहे. हा Vivo फोन Android 12 सह येतो.

आणखी वाचा : तुमचा इंटरनेट डेटा संपणार नाही! Jio च्या धांसू रिचार्ज पॅकमध्ये २५२ GB, अनलिमिटेड कॉल आणि फ्री ऑफर्स


Vivo V23 5G स्मार्टफोनमध्ये एपर्चर F/१.८९ सह ६४ मेगापिक्सेल प्रायमरी, अपर्चर F/२.२ सह ८ मेगापिक्सेल वाइड-अॅंगल आणि अपर्चर F/२.४ सह २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. हँडसेटमध्ये ऍपर्चर F/२.० सह ५० मेगापिक्सेल प्रायमरी फ्रंट सेन्सर आहे. याशिवाय, फ्रंटमध्ये ८ मेगापिक्सलचा वाइड-अॅंगल सेन्सर आहे जो अपर्चर F/२.२८ सह येतो.


कनेक्टिव्हिटीसाठी Vivo V23 5G मध्ये 5G, 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, USB टाइप-C, USB OTG आणि ब्लूटूथ ५.२ सारखी फीचर्स प्रदान करण्यात आली आहेत. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, एक्सेलेरोमीटर, अॅम्बियंट लाइट सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर, ई-कंपास, जायरोस्कोप, जीपीएस, ग्लोनास देखील देण्यात आले आहेत. या Vivo स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी 4200mAh बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हँडसेटची डायमेंशन्स १५७.२×७२.४२×७.३९ मिलीमीटर आणि वजन १७९ ग्रॅम आहे.