Vivo V23 Series Launch Today: व्हिवो व्ही २३ (Vivo V23) आणि व्हिवो व्ही २३ प्रो (Vivo V23 Pro) आज भारतात लॉंच झाला आहे. ही 5G ची सिरीज आहे. या फोनची खास गोष्ट म्हणजे याचे बॅक डिझाइन. व्हिवोने दावा केला आहे की हा पहिला स्मार्टफोन आहे जो बॅक पॅनल वर कलर चेंजिंग इफेक्टसह येईल. व्हिवोचा हा लॉन्च इव्हेंट दुपारी १२ वाजता झाला.

Vivo V23, V23 Pro: भारतातील किंमत, विक्रीची तारीख

व्हिवो व्ही २३ ची ८ GB रॅम पर्यायाची किंमत २९,९९० रुपये आहे तर १२GB रॅम पर्यायाची किंमत ३४,९९० रुपये आहे. व्हिवो व्ही २३ प्रो ची ८ GB रॅम पर्यायाची किंमत ३८,९९० रुपये आहे आणि १२GB रॅम पर्यायाची किंमत ४३,९९० रुपये आहे. फोन आज, ५ जानेवारी, २०२२ पासून प्री-बुकिंगसाठी खुले असतील. व्हिवो व्ही २३ प्रो १३ जानेवारी रोजी उपलब्ध करून दिला जाईल, तर व्ही २३ १९ जानेवारी, २०२२ पासून खरेदीसाठी उपलब्ध असेल.

google steps to lay off more employees
गूगलकडून कर्मचारी कपातीचे पाऊल; भारतासह इतर देशांमध्ये काही व्यवसायांचे स्थलांतर करणार
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Loksatta anvyarth Domestic production expansion to increase exports of electronics from India
अन्वयार्थ: भारतीय जीबी, टीबी चीनच्या स्वाधीन
ExlService Holdings
अमेरिकन आयटी कंपनीनं भारत व यूएसमधील ८०० कर्मचाऱ्यांची केली कपात; आता AI तज्ज्ञांची होतेय भरती!

(हे ही वाचा: नाद खुळा ऑफर… चिनी फोन द्या अन् नवा Made in India फोन घेऊन जा; ‘या’ कंपनीची भन्नाट ऑफर)

स्‍पे᠎सिफ़िकेशन काय आहेत?

दोन्ही फोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतात. सनशाइन गोल्ड ज्याच्या मागील बाजूस रंग बदलणारी काच आणि स्टारडस्ट ब्लॅक आहे. व्हिवो मागील बाजूस मॅट फिनिश टिकवून ठेवण्यास व्यवस्थापित केले आहे आणि मागचा भाग बोटांना प्रतिरोधक असल्याचा दावा केला आहे. दोन्ही फोन Android 12 वर आधारित Funtouch OS 12 चालतात. व्ही २३ सिरीज अल्ट्रा-स्लिम डिझाइनसह येते. परंतु कोणत्याही डिव्हाइसवर हेडफोन जॅक किंवा मायक्रोएसडी स्लॉट नाही. परंतु कंपनी बॉक्समध्ये ३.५ मिमी इअरफोन जॅक अॅडॉप्टरसह इअरफोन देत आहेत.

(हे ही वाचा: TECNO SPARK 8 Pro भारतात लाँच, किंमत ११,००० रुपयांपेक्षाही कमी!)

फोनवर ऑफर्स

व्हिवो त्यांच्या वेबसाइटवर फोन प्री-बुक करणाऱ्यांसाठी १० टक्के कॅशबॅक देखील देत आहे. पण हे फक्त ICICI बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डसाठी आहे. कोणत्याही नुकसानीसाठी सहा महिन्यांपर्यंतची वॉरंटी आणि रु. २५०० कॅशबॅक आणि क्याशीफाय (Cashify) च्या सहकार्याने ७० टक्क्यांपर्यंत बायबॅक मूल्य देखील देत आहे. फ्लिपकार्ट वर, फोनला ३००० रुपयांचा झटपट कॅशबॅक मिळेल ज्यांनी डिव्हाइसचे प्री-बुकिंग केले आहे आणि कॅशिफाय एक्सचेंज पर्याय आणि सहा महिन्यांसाठी व्ही शील्ड संरक्षण आहे.