Ganesh Chaturthi: Vivo ची धमाकेदार ऑफर, Vivo V25 Pro, Vivo V75 आणि Vivo X80 वर ४००० रूपयांपर्यंत सूट | vivo v25 pro vivo v75 vivo x80 series discount offers 4000 rupees know all new offers prp 93 | Loksatta

Ganesh Chaturthi: Vivo ची धमाकेदार ऑफर, Vivo V25 Pro, Vivo V75 आणि Vivo X80 वर ४००० रूपयांपर्यंत सूट

जर तुम्ही Vivo स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. ही माहिती एकदा वाचा.

Ganesh-Chaturthi-2022-Discount-Offers

जर तुम्ही Vivo स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. Vivo ने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या निवडक स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर जाहीर केल्या आहेत. Vivo V25 Pro, Vivo X80 Series आणि Vivo Y75 बँक ऑफर्ससह खरेदी केले जाऊ शकतात. हे Vivo स्मार्टफोन्स कलर चेंजिंग टेक्नॉलॉजी, प्रोफेशनल मोबाईल फोटोग्राफी आणि Eye AF सेल्फी कॅमेरा टेक्नॉलॉजी सह येतात.

कंपनी Vivo V25 Pro, Vivo X80 सीरीज आणि Vivo Y75 स्मार्टफोन्सवर आकर्षक कॅशबॅक ऑफर देत आहे. आयसीआयसीआय बँक, कोटक बँक आणि एसबीआय बँक क्रेडिट कार्डसह या स्मार्टफोन्सच्या खरेदीवर कॅशबॅक उपलब्ध असेल. Vivo हँडसेटवर उपलब्ध असलेल्या या ऑफर १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत सर्व पार्टनर रिटेल स्टोअर्सवर घेता येतील.

आणखी वाचा : ६४ MP कॅमेरा असलेला Vivo V25e स्मार्टफोन लॉंच, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Vivo V25 Pro Price Offers
या ऑफरमध्ये Vivo V25 Pro खरेदी केल्यास ३,५०० रुपयांपर्यंत कॅशबॅक सूट मिळेल. V25 Pro स्मार्टफोन रंग बदलणाऱ्या फ्लोराईट एजी ग्लाससह येतो. यात ६४ मेगापिक्सलचा OIS नाईट कॅमेरा आहे. Vivo चा हा मोबाईल 3D कर्व्ड डिस्प्ले सह येतो. या स्मार्टफोनमध्ये ३२ MP Eye AF सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे.

Vivo Y75 Price Offers
Vivo Y75 या वर्षी लॉंच झाला आहे. हा स्मार्टफोन क्रेडिट कार्डद्वारे घेतल्यास तुम्हाला १,५०० रुपयांपर्यंत सूट मिळेल. हा हँडसेट आकर्षक डिझाइनसह येतो. यात MediaTek Helio G96 चिपसेटसह प्रीमियम बिल्ड गुणवत्ता आहे. या Vivo हँडसेटमध्ये ५० मेगापिक्सलचा सुपर नाईट कॅमेरा आणि ४४ मेगापिक्सेल AF सेल्फी कॅमेरा आहे.

आणखी वाचा : Realme Fan Festival: Realme स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट, स्वस्तात खरेदी करण्याची संधी

Vivo X80 series
Vivo X80 मालिकेला ZEISS सह पार्टनरशीपमध्ये उद्योगातील पहिला ZEISS Gimbal पोर्ट्रेट कॅमेरा मिळाला आहे. याशिवाय मीडियाटेक डायमेंशन ९००० चिपसेट देखील हँडसेटमध्ये आहे. Vivo X80 मध्ये ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा-सेन्सिंग IMX866 सेन्सर आहे.

Vivo X80 सीरिजचा फोन ३० सप्टेंबरपर्यंत गणेश चतुर्थी स्पेशल ऑफरमध्ये क्रेडिट कार्डद्वारे घेतल्यास ४००० रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-08-2022 at 18:23 IST
Next Story
Redmi 11 Prime 5G फोन भारतात ६ सप्टेंबरला होणार लाँच; जाणून घ्या किंमत आणि बरंच काही..