६४ MP कॅमेरा असलेला Vivo V25e स्मार्टफोन लॉंच, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या | vivo v25e launched price 1399myr specifications features 64 megapixel triple rear cameras prp 93 | Loksatta

६४ MP कॅमेरा असलेला Vivo V25e स्मार्टफोन लॉंच, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Vivo V25e स्मार्टफोन हा Vivo V23e चा एक अपग्रेड व्हेरिएंट आहे जो गेल्या वर्षी लॉंच झाला होता.

vivo-v25e

Vivo ने मलेशियामध्ये आपल्या V-Series मालिकेतील नवीन स्मार्टफोन लॉंच केला आहे. Vivo V25e स्मार्टफोन हा Vivo V23e चा एक अपग्रेड व्हेरिएंट आहे जो गेल्या वर्षी लॉंच झाला होता. Vivo V25e मध्ये वॉटरड्रॉप-स्टाईल डिस्प्ले नॉच आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. हा नवीन Vivo स्मार्टफोन ६४ MP रियर कॅमेरा, ४५०० mAh बॅटरी आणि ९० Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले यांसारख्या फीचर्ससह येतो. फोनच्या मागील बाजूस रंग बदलणारा ग्लास बॅक पॅनल आहे. Vivo V25e ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स याबद्दल सर्वकाही जाणून घ्या…

Vivo V25e price
Vivo V25e स्मार्टफोन १,३९९ MYR (सुमारे २४,९०० रुपये) मध्ये ८ GB रॅम आणि २५६ GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा फोन मलेशियातील Vivo च्या ऑनलाइन स्टोअरवर लिस्ट करण्यात आला आहे. नवीन हँडसेट डायमंड ब्लॅक आणि सनराइज गोल्ड कलरमध्ये लॉंच करण्यात आला आहे. सध्या इतर बाजारपेठेत हँडसेटच्या उपलब्धतेबाबत कोणतीही माहिती नाही.

याआधी कंपनीने नुकतेच Vivo V25 सीरीजचा Vivo V25 Pro भारतात लॉंच केला आहे.

आणखी वाचा : Realme Fan Festival: Realme स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट, स्वस्तात खरेदी करण्याची संधी

Vivo V25e specifications
Vivo V25e स्मार्टफोनमध्ये ६.४४ इंच फुलएचडी + (१,०८० x २,४०४ पिक्सेल) रिझोल्यूशनचा AMOLED डिस्प्ले आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट ९० Hz आहे. डिस्प्लेवर वॉटरड्रॉप स्टाइल नॉच देण्यात आला आहे. Vivo V सीरीजच्या या नवीन फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलिओ G ९९ प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. स्मार्टफोनमध्ये २५६ GB इनबिल्ट स्टोरेज आहे जे मायक्रोएसडी कार्डद्वारे १ TB पर्यंत वाढवता येते.

Vivo V25e मध्ये ६४ मेगापिक्सेलचा प्रायमरी रीअर सेन्सर आहे, जो एपर्चर F/१.९ आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह येतो. याशिवाय २ मेगापिक्सेल बोकेह आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर मागील बाजूस उपलब्ध आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी, Vivo V25e मध्ये ३२ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे ज्यामध्ये अपर्चर F/२.० आहे.

आणखी वाचा : Disney Plus Hotstar Jio Fiber Airtel Xstream Broadband Plans: मोफत पाहा डिझ्ने प्लस हॉटस्टार, अनलिमिटेड कॉल आणि बरंच काही…

Vivo V25e ला ४५०० mAh बॅटरी आहे जी ४४ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनची परिमाणे १५९.२०×७४.२०×७.७९ मिलीमीटर आणि वजन १८३ ग्रॅम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, Vivo V25e मध्ये Wi-Fi, Bluetooth 5.2, GPS, 3.5mm ऑडिओ जॅक आणि USB Type-C पोर्ट सारखी फीचर्स उपलब्ध आहेत. फोनमध्ये एक्सलेरोमीटर, ई-कंपास, अॅम्बियंट लाइट सेन्सर, जायरोस्कोप आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर देण्यात आले आहेत. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. हा Vivo फोन रंग बदलणाऱ्या मागील ग्लास पॅनेलसह येतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-08-2022 at 21:42 IST
Next Story
आता कोणताही पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही; फक्त फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स