Vivo ने गेल्या वर्षी आपला Vivo Y73 स्मार्टफोन भारतात लॉन्च केला होता. Vivo Y73 स्मार्टफोन भारतात २० हजार रूपयांपेक्षा कमी कॅटेगरीत ८ GB रॅम आणि १२८ GB इनबिल्ट स्टोरेज उपलब्ध करून दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. Vivo Y73 सध्या Amazon India वरून डिस्काउंटसह खरेदी केले जाऊ शकते. आम्ही तुम्हाला Vivo Y73 वर उपलब्ध असलेल्या सर्व ऑफर्स आणि डील्सबद्दल माहिती देत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Vivo Y73 Price
Vivo Y73 स्मार्टफोन देशात २०,९९० रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. पण सध्या हा हँडसेट Amazon वरून १९, ९८९ रुपयांना खरेदी करता येईल. याशिवाय २,२२१ रुपयांच्या विनाशुल्क ईएमआयवर फोन खरेदी करण्याचीही संधी आहे. SBI क्रेडिट कार्ड EMI ट्रान्झॅक्शनद्वारे हँडसेट खरेदी करण्यावर तुम्हाला १००० रूपयांपर्यंत सूट मिळेल. स्मार्टफोनवर ९,२०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आहे. प्राईम ग्राहकांना Amazon वरून फोन खरेदी केल्यावर ६ महिन्यांसाठी मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफर देखील दिली जात आहे. हा फोन डायमंड ब्लू आणि रोमन ब्लॅक कलरमध्ये घेतला जाऊ शकतो.

आणखी वाचा : Vivo V25  सीरीजचे महत्वाचे स्पेसिफिकेशन लॉंचपूर्वीच लीक, १२ GB रॅमसह ५० MP कॅमेरा

Vivo Y73 Specifications

Vivo Y73 स्मार्टफोनमध्ये ६.४४ इंच फुलएचडी + (१,०८० ×२,४०० पिक्सेल) AMOLED डिस्प्ले आहे. फोनच्या स्क्रीनवर नॉच आहे. हँडसेटमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Helio G95 प्रोसेसर देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये ८ GB रॅम असून ३ GB विस्तारित रॅमचा पर्यायही उपलब्ध आहे. फोनमध्ये १२८ GB इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय आहे आणि स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे १ TB पर्यंत वाढवता येऊ शकते.

फोनमधील फोटोग्राफीसाठी, Vivo Y73 मध्ये एपर्चर F/१.७९ सह ६४ मेगापिक्सेल प्रायमरी, अपर्चर F/२.४ सह २ मेगापिक्सेल डेप्थ आणि अपर्चर F/२.४ सह २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर एफ/२.० अपर्चरसह आहे.

आणखी वाचा : कोट्यावधी अँड्रॉइड फोन युजर्ससाठी उपयोगाची माहिती, या ५ गोष्टी जाणून घ्या

कनेक्टिव्हिटीसाठी, Vivo Y73 मध्ये ४ जी, ड्युअल-बँड वाय-फाय, GPS, ब्लूटूथ ५.०, ३.५ mm हेडफोन जॅक आणि USB टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हँडसेटमध्ये एक्सीलरोमीटर, अॅम्बियंट लाइट सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर, ई-कंपास आणि जायरोस्कोप देखील उपलब्ध आहेत. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. Vivo Y73 ला ३३ W फास्ट चार्जिंगसह ४००० mAh बॅटरीचा सपोर्ट आहे. फोनचे डायमेंशन १६१.२४×७४.३७×७.३८ मिलीमीटर आणि वजन १७० ग्रॅम आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivo y73 price cut in india 19989 rupees amazon india features specifications 8gb ram prp
First published on: 16-06-2022 at 22:06 IST