Vivo ने आपला नवीन Y-Series स्मार्टफोन चीनमध्ये लॉंच केला आहे. Vivo Y75s हा कंपनीचा नवीन हँडसेट आहे आणि त्यात MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आहे. Vivo Y75S मध्ये ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन एक्सटेंडेड रॅम फीचरसह येतो. Vivo च्या या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, ६.५८ इंच स्क्रीन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल सर्वकाही जाणून घ्या…

Vivo Y75s Price
Vivo Y75s 5G च्या ८ GB रॅम आणि २५६ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,८९९ चीनी युआन (सुमारे २१,७०० रुपये) आहे. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट २,१९९ चीनी युआन (सुमारे २५,२०० रुपये) मध्ये उपलब्ध असेल. हा फोन आयरिश आणि स्टाररी नाईट रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
Elon Musk Is Testing Adult Content Group feature users to create communities around adult sensitive content
‘एक्स’ आता नव्या युजरला पैसे आकारणार, एलॉन मस्क यांचा निर्णय
Mumbai Metro Introduces Wristband Ticketing for Metro 1 Route No Need for Paper or Mobile Tickets
‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी आता मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकिट सेवा कार्यान्वित
How to restrict WhatsApp media downloads
‘गुड मॉर्निंग’च्या फोटोने गॅलरी फुल? WhatsApp सेटिंगमधील ‘हा’ एक बदल करील तुम्हाला मदत; पाहा टिप्स….

आणखी वाचा : तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती तुमचे Whatsapp Chat वाचू शकणार नाही, ही ट्रिक वापरा!

Vivo Y75s Specifications
Vivo Y75S मध्ये ६.५८ इंच फुलएचडी + १०८० x २४०० पिक्सेल डिस्प्ले आहे. स्क्रीन रिफ्रेश रेट ६० Hz आहे आणि टच सॅम्पलिंग रेट १२० Hz आहे. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशो ९०.६१% आहे आणि पिक्सेल डेन्सिटी ४०१ ppi आहे. स्मार्टफोन MediaTek Dimensity 700 chipset द्वारे समर्थित आहे जो २.२ GHz क्लॉक स्पीडसह येतो. फोनमध्ये ८ जीबी आणि १२ जीबी रॅमसह २५६ जीबी स्टोरेजचा पर्याय आहे.

Vivo Y75S मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सल प्रायमरी, ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर आहे. स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे ज्यात अपर्चर F/२.० आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील उपलब्ध आहे.

आणखी वाचा : Jio 6th Anniversary Offer: जिओच्या नवीन प्लॅनमध्ये ९०० GB पेक्षा जास्त डेटा, १ वर्षासाठी रिचार्जची चिंता नाही

Vivo Y75s स्मार्टफोन Android 11 सह येतो ज्यावर OriginOS Ocean स्क्रीन देण्यात आली आहे. हँडसेटला चार्ज करण्यासाठी ५००० mAh बॅटरी उपलब्ध आहे, जी १८ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये 5G, Wi-Fi 802.11 ac, Bluetooth 5.1, GPS/GLONASS, USB Type-C आणि ३.५ mm ऑडिओ जॅक देण्यात आला आहे.

Vivo लवकरच Vivo Y02s आणि Vivo Y02 Jio स्मार्टफोन भारतात लॉंच करेल, असंही सांगण्यात येतंय. हे दोन्ही एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहेत आणि लीकचा दावा आहे की, या फोनसाठी Vivo आणि Jio ने भागीदारी केली आहे. कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.