वोडाफोन-आयडिया ही देशातील सर्वात मोठी तिसरी टेलिकॉम कंपनी आहे. व्हीआय कंपनीला अजून आपले ५ जी नेटवर्क देशामध्ये सुरू करता आलेले नाही. मात्र ते लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. वोडाफोन आयडिया डिस्नी + हॉटस्टारसह ग्राहकांसाठी अनेक प्रीपेड प्लॅन्स ऑफर करत आहे. आज आपण ते प्लॅन्स कोणकोणते आहेत आणि त्याची वैधता काय असणार आहे ते पाहणार आहोत. तसेच आज आपण जे प्लॅन पाहणार आहोत त्यात वापरकर्त्यांसाठी बोनस डेटा देखील मिळणार आहे.

ज्यांना डिस्नी + हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन घ्यायचे आहे त्यांच्यासाठी हे प्लॅन्स चांगले आहेत. कारण या प्लॅन्समध्ये त्यांना मुबलक डेटा देखील मिळणार आहे. वोडाफोन आयडियाकडे असे अनेक प्लॅन्स आहेत त्यासह वापरकर्त्यांना बोनस डेटासह मोफत डिस्नी + हॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळते. तसेच हे सर्व प्लॅन्स २८ दिवसांच्या वैधतेसह येतात. या प्लॅन्सची किंमत ३९९, ४९९ आणि ६०१ रुपये अशी आहे. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

हेही वाचा : जिओ AirFiber ‘या’ शहरांमध्ये उपलब्ध; युजर्सना पाहता येणार ५५० पेक्षा जास्त डिजिटल चॅनेल्स, एकदा प्लॅन्स पाहाच

व्हीआयचा ३९९ रुपयांचा प्लॅन

वोडाफोन आयडियाच्या ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि दररोज २.५ जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये व्हीआय हिरो अनलिमिटेड बेनिफिट्ससह येतो. यामध्ये ३ महिन्यासाठी डिस्नी + हॉटस्टार मोबाइलचे सबस्क्रिप्शन आणि व्हीआय मुव्हीज आणि टीव्ही व्हीआयपी मिळतात. या प्लॅनमध्ये ५जीबी बोनस डेटाचा समावेश आहे.

व्हीआयचा ४९९ रुपयांचा प्लॅन

वोडाफोन आयडियाच्या ४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि दररोज ३ जीबी डेटा मिळतो. वापरकर्त्यांना या प्लॅनसह ३ महिन्याचे मोफत डिस्नी + हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन आणि व्हीआय मुव्हीज आणि टीव्ही व्हीआयपीसह व्हीआय हिरो अनलिमिटेडचा फायदा मिळतो. तसेच ५ जीबी इतका बोनस डेटा देखी या प्लॅनमध्ये मिळतो.

व्हीआयचा ६०१ रुपयांचा प्लॅन

जर का तुम्हाला एका वर्षासाठी डिस्नी + हॉटस्टार मोबाइलचे सबस्क्रिप्शन हवे असल्यास वोडाफोन आयडियाचा ६०१ रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना २८ दिवसांची वैधता मिळते. तसेच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि ३ जीबी दररोजचा डेटा ऑफर केला जातो. तसेच हिरो अनलिमिटेडचे फायदे यात मिळतात. वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये १६ जीबी इतका बोनस डेटा मिळणार आहे.

Story img Loader