scorecardresearch

Vodafone Idea vs Reliance Jio: ३९९ रुपयांमध्ये कोणता प्लॅन बेस्ट? अनलिमिटेड कॉल्स आणि बरंच काही…

Jio आणि Vi च्या ३९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.

Vodafone Idea vs Reliance Jio: ३९९ रुपयांमध्ये कोणता प्लॅन बेस्ट? अनलिमिटेड कॉल्स आणि बरंच काही…
व्होडाफोन आयडियाचा स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन.(Photo-File Photo)

Vodafone Idea (vi) आणि Reliance Jio या टेलिकॉम कंपनी ग्राहकांना जबरदस्त प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्स ऑफर करतात जे खूप परवडणारे असतात. म्हणूनच देशातील सर्व टेलिकॉम कंपन्यांमध्ये रिलायन्स जिओ आणि वोडाफोन आहे. तुम्हीही यापैकी कोणत्या कंपनीचे युजर असाल तर आज आम्ही Jio आणि Vi च्या ३९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.

Vodafone Idea (Vi) ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
Vodafone Idea (Vi) चा ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ४० GB हाय-स्पीड 4G डेटा मिळतो. याशिवाय प्लॅनमध्ये ५० GB अतिरिक्त डेटा देखील देण्यात आला आहे. याचा अर्थ तुम्ही फक्त ३९९ रुपयांमध्ये ९० GB हाय-स्पीड डेटाचा लाभ घेऊ शकाल. परंतु हे लक्षात घेण्यासारखं आहे की, अतिरिक्त ५० GB इंटरनेट डेटा फक्त ऑनलाइन रिचार्जवर उपलब्ध असेल.

व्होडाफोनच्या या प्लॅनमध्ये डेटा रोलओव्हर सुविधाही उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये ग्राहकांना २०० GB पर्यंत डेटा रोलओव्हर मिळतो. याशिवाय Vodafone Idea च्या या प्लॅनमध्ये १०० SMS देखील देण्यात आले आहेत. व्होडाफोन यूजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलची ऑफर दिली जाते. म्हणजेच, देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग सुविधा मोफत देण्यात येते.

आणखी वाचा : Reliance Jio Value Plans: १९९ रुपयांपासून सुरू, ३३६ दिवसांपर्यंत वैधता, अनलिमिटेड कॉल आणि फ्री ऑफर

Vi च्या या प्लॅनमध्ये Vi Movies आणि TV अॅपचे VIP सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. यासोबत तुम्ही Vi अॅपमध्ये ६ महिने जाहिरातमुक्त हंगामा म्युझिकचा आनंद घेऊ शकता. Vi Movies & TV अॅपद्वारे ZEE5 वर प्रीमियम चित्रपट आणि शोचा आनंदही घेता येतो.

रिलायन्स जिओचा ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
रिलायन्स जिओचा ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन देखील आहे. या पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना ७५ GB डेटा दिला जातो. हा डेटा संपल्यानंतर ग्राहकांना १ जीबी डेटासाठी १० रुपये द्यावे लागतात. प्लॅनमध्ये २०० GB डेटा रोलओव्हर सुविधा देखील उपलब्ध आहे. जिओचा हा प्लॅन अनलिमिटेड व्हॉईस कॉलसह येतो. याशिवाय या प्लॅनमध्ये १०० एसएमएसही मोफत उपलब्ध आहेत. विशेष बाब म्हणजे जिओच्या या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि डिस्ने + हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. या प्लॅनमध्ये Jio अॅप्सचा अॅक्सेसही मोफत उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या