Premium

Vodafone Idea चा ‘हा’ आहे जबरदस्त फॅमिली प्लॅन; अनलिमिटेड कॉलिंग आणि मिळणार…

वोडाफोन-आयडिया ही देशातील सर्वात मोठी तिसऱ्या क्रमांकांची टेलिकॉम कंपनी आहे.

vi 601 rs family postpaid rechage plan
वोडाफोन आयडियाकडे अनेक पोस्टपेड प्लॅन्स आहेत. (Image Credit-Financial )

वोडाफोन-आयडिया ही देशातील सर्वात मोठी तिसऱ्या क्रमांकांची टेलिकॉम कंपनी आहे. वोडाफोन-आयडिया कंपनीला देशभरात अजून एकले ५ जी नेटवर्क सुरु करता आलेले नाही. लवकरच ते ५ जी नेटवर्क लॉन्च होण्याची शक्यता आहे. व्हीआय देशातील एक नंबरची पोस्टपेड प्लॅन ऑफर करणारी कंपनी आहे. वोडाफोन आयडिया टेलिकॉम कंपनी व्यक्ती (TSP) आणि परिवार या दोघांना लक्षात ठेवून पोस्टपेड प्लॅन ऑफर करतो. जर का तुम्ही कौटुंबिक पोस्टपेड प्लॅनच्या शोधात असाल तर व्हीआयकडे तुम्हाला अनेक चांगले प्लॅन्स मिळतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वोडाफोन-आयडियाचे पोस्टपेड प्लॅन हे देशातील सर्व ठिकाणी उपलब्ध आहे. टेलिकॉम कंपनी अनेक चांगले पोस्टपेड प्लॅन ऑफर करते. त्यात अनेक फायदे देखील ग्राहकांना मिळतात. हा पोस्टपेड प्लॅन किती रुपयांचा आहे आणि त्यात कोणकोणते फायदे ग्राहकांना मिळतात ते जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

हेही वाचा : iPhone 14 Plus स्वस्तात खरेदी करण्याची संधी; ‘या’ ठिकाणी मिळतोय ३६ हजारांचा डिस्काउंट

व्हीआयचा ६०१ रुपयांचा फॅमिली पोस्टपेड प्लॅन

वोडाफोन-आयडीयाच्या ६०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स आणि महिन्याला ३००० एसएमएस करण्याचे फायदे मिळतात. वापरकर्त्यांना २०० जीबी डेटासह ७० जीबी FUP डेटा मिळतो. प्लॅनमध्ये हंगाम म्युझिक, व्हीआय मुव्हीज, एन्ड टीव्ही आणि व्हीआय गेम्सचे अतिरिक्त फायदे मिळतात. याशिवाय, वापरकर्त्यांना एका वर्षासाठी मोबाइलचे सोनी लिव्हचे, तसेच मोबाइलचे डिस्नी + हॉटस्टारचे आणि सहा महिन्यांसाठी Amazon प्राइम, एका वर्षासाठी SunNXT चे टीव्ही आणि मोबाइलचे सबस्क्रिप्शन मिळते.

हा एक फॅमिली पोस्टपेड प्लॅन आहे. यासाठी वापरकर्त्यांना एक सेकेंडरी सिम कर देखील मिळते. हा एक फॅमिली पोस्टपेड प्लॅन आहे. यासाठी वापरकर्त्यांना एक सेकेंडरी सिम कर देखील मिळते. सेकेंडरी सिम कार्डसह वापरकर्त्यांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि ४० जीबी डेटा मिळतो. याशिवाय १० जीबी डेटा अतिरिक्त डेटा देखील देण्यात आला आहे. जो प्लॅन कुटुंबातील सदस्यांसह शेअर केला जाऊ शकतो. व्हीआयने अजून ५जी नेटवर्क लॉन्च केले नसल्यामुळे कंपनी ग्राहकांना ५जी पोस्टपेडचा अनुभव देऊ शकत नाही. व्हीआयने नुकतेच आपल्या प्रीमियम पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी व्हीआय प्रायोरिटी लॉन्च केली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vodafone idea 601 rs family postpaid plan unlimited voice calling vi movies check details tmb 01

First published on: 25-09-2023 at 17:05 IST
Next Story
iPhone 14 Plus स्वस्तात खरेदी करण्याची संधी; ‘या’ ठिकाणी मिळतोय ३६ हजारांचा डिस्काउंट