scorecardresearch

व्होडाफोन आयडियाच्या धमाकेदार प्लॅनने उडवली जिओ, एअरटेलची झोप! दररोज १.५जिबी डेटा आणि बरेच काही

व्होडाफोन आयडिया (Vi) भारतभरात राहणाऱ्या प्रीपेड ग्राहकांसाठी ५९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करते.

५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये Vi Movies आणि TV Classic चे ओव्हर-द-टॉप (OTT) फायदे देखील समाविष्ट आहेत. (photo credit: indian express)

व्होडाफोन आयडिया (Vi) भारतभरात राहणाऱ्या प्रीपेड ग्राहकांसाठी ५९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करते. या प्लॅनची खासियत म्हणजे याची वैधता ७० दिवसांची आहे. डेटाच्या बाबतीत, वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि १०० एसएमएस/दिवसासह १.५ जिबी दैनिक डेटा मिळतो. दरम्यान व्हीआयच्या प्लॅनमुळे जिओ आणि एअरटेलचे प्लॅन्स अयशस्वी ठरले आहेत. जिओचा ६९९ रुपये आणि एअरटेलचा ७१९ रूपयांचा प्लॅन ८४ दिवसांची वैधता ऑफर करतो. चला जाणून घेऊया Vi ची नवीन धमाकेदार प्लॅन बद्दल……

या प्लॅनमध्ये अनेक फायदे उपलब्ध आहेत

प्लॅनमध्ये Vi Hero Unlimited फायद्यांचाही समावेश आहे. ज्यात डेटा डिलाईट्स, वीकेंड रोलओव्हर आणि बिंज ऑल नाईट ऑफरचा समावेश आहे. सर्व अतिरिक्त ऑफर वापरकर्त्यांचा डेटा वापर अनुभव वाढवण्यासाठी आहेत. हा प्लॅन जिओ आणि एअरटेलच्या ८४ दिवसांच्या प्लॅन पेक्षा खूप स्वस्त आहे.

व्होडाफोन आयडियाच्या प्लॅनसमोर जिओ आणि एअरटेलचे प्लॅन फेल

१४ दिवस अधिक सेवा घेण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात. जिओच्या ६६६ रुपयांच्या आणि एअरटेलच्या ७१९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वैधता उपलब्ध आहे. त्या प्लॅनमध्ये १.५जिबी डेटा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे Vi चा ५९९ रुपयांचा प्लॅन स्वस्त वाटतो. व्होडाफोन तुमच्या प्लॅनसह ग्राहकांना अतिरिक्त ऑफर देत आहे. व्हीआयच्या ८४ दिवसांच्या प्लॅनमध्ये १.५ जिबी दैनंदिन डेटासाठी ७१९ रुपये खर्च येतो, तर ७० दिवसांच्या प्लॅनचा ग्राहकांना खूप फायदा होत आहे.

व्होडाफोन आयडियाच्या ५९९ रुपयांच्या प्लॅनचे फायदे

५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये Vi Movies आणि TV Classic चे ओव्हर-द-टॉप (OTT) फायदे देखील समाविष्ट आहेत. जर तुम्हाला थोडा कमी खर्च करायचा असेल आणि मध्यम मुदतीसाठी प्रीपेड प्लॅन हवा असेल तर व्होडाफोन आयडियाचा ५९९ रूपयांचा प्लॅन हा एक चांगला पर्याय आहे. जर वापरकर्ता व्हीआय कडून ५९९ रूपयांचा प्लॅन निवडत असेल, तर तो मोबाईल सेवांसाठी दररोज ८.५६ रुपये खर्च करेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vodafone idea rs 599 prepaid plan better than jio airtel 84 days plan check all benefits scsm

ताज्या बातम्या