भारतामध्ये सध्या Relaince Jio आणि Airtel या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांनी आपले ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. मात्र Vodafone- Idea या टेलिकॉम कंपनीला अजूनही आपले ५ जी नेटवर्क सुरू करता आलेले नाही. ५ जी नेटवर्क सुरू करण्यासाठी व्हीआय प्रयत्न करत आहे. त्यातच आता कंपनीने एक निर्णय घेतला आहे. तो निर्णय काय आहे त्याबद्दल जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हीआयने आपले ९९ आणि १२८ रुपयांचे जे रिचार्ज प्लॅन्स आहेत. त्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची वैधता कमी केली आहे. Q4 FY23 मध्ये टेल्कोच्या ARPU मध्ये QoQ वाढ झाली नाही. ९९ आणि १२८ रुपयांच्या प्लॅनची वैधता कमी केल्यामुळे व्हीआयला फार मदत मिळणार आहे. याबाबतचे वृत्त telecom talk ने दिले आहे.

हेही वाचा : Airtel चे सिम अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी वापरकर्त्यांना ‘हा’ मिनिमम रिचार्ज प्लॅन वापरावा लागणार, जाणून घ्या

कंपनीने या प्लॅनची वैधता कमी केल्याचा अर्थ असा आहे, जे ग्राहक एका महिन्यासाठी ९९ रुपयांचा प्लॅन रिचार्ज करतात. त्यांना आता महिन्यातून दोनवर रिचार्ज करावे लागणार आहे. यामुळे व्हीआयचा महसूल वाढण्यास मदत होणार आहे. तसेच ARPU देकील वाढू शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे हे बदल सध्या मुंबईच्या टेलिकॉम सर्कलमध्ये दिसत आहेत. आता आपण ९९ आणि १२८ रुपयांच्या प्लॅनची नवीन वैधता काय असणार आहे ते जाणून घेऊयात.

व्हीआयचा ९९ रुपयांचा प्लॅन

पहिल्यांदा ९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळायची. मात्र आता तुम्हाला केवळ १५ दिवसांचीच वैधता मिळणार आहे. म्हणजेच या प्लॅनची दिवसाची किंमत ३.५३ रुपयांवरून ६.६ रुपये इतकी झाली आहे. यामध्ये तुम्हाला २०० एमबी डेटा आणि ९९ रुपयांचा टॉकटाइम मिळेल. मात्र एसएमएस करण्याची सुविधा मिळणार नाही.

व्हीआयचा १२८ रुपयांचा प्लॅन

व्हीआयच्या १२८ रुपयांच्या प्लॅनची वैधता ही २८ दिवसांवरून आता १८ दिवस इतकी करण्यात आली आहे. आता याची दिवसाची किंमत ४.५७ रुपयांवरून ७.११ रुपयांवर गेली आहे. वापरकर्त्यांना या प्लॅन अंतर्गत १० लोकल ऑन-नेट नाईट मिनिटे + सर्व स्थानिक/राष्ट्रीय कॉल 2.5p/सेकंद वर मिळणार आहेत. याशिवाय रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट मिनिट्सचा फायदा घेता येणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vodafone idea telicom compnay reduce 99 and 128 rs recharge plan validity check all details tmb 01
First published on: 29-05-2023 at 16:41 IST