अनेक लोक घरात बसून टीव्हीवर चित्रपट पाहणे पसंत करतात. एरव्ही बाजारात मोठ्या स्क्रिनच्या टीव्ही उपलब्ध असल्याने थियटरचा माहोल देखील घरीच काही प्रमाणात निर्माण होत आहे. त्यामुळे देखील नागरिकांचा टीव्ही घेण्याकडे कल वाढला आहे. तसेच टीव्हीमध्ये देखील मोबाइल प्रमाणे प्लेस्टोअर आणि इतर अॅप्स डाउनलोड होत असल्याने लोकांना गाण्यांची अॅप, फेसबुक इत्यादींचा आनंद आपल्या टीव्हीवर घेणे शक्य झाले आहे. नागरिकांचा आनंद द्विगुणीत व्हावा यासाठी टीव्ही निर्मात्या कंपन्या प्रयत्नशील आहेत. व्हीयूने भारतात आपले तीन नवे स्मार्ट टीव्ही बाजारात लाँच केले आहे. जाणून घेऊ त्यांची किंमत आणि फिचर्स.

व्हीयूने भारतात ग्लो पॅनल, ग्लो एआय प्रोसेसर आणि गुगल टीव्ही ओएससह ३३ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीपासून नवी व्हीयू ग्लोएलइडी टीव्ही सिरीज लाँच केली आहे. ग्लोएलइडी प्रोसेसरसह ग्लो पॅनल टीव्हीची ब्राइटनेस ६० टक्क्यांपर्यंत वाढवेल, असा दावा कंपनीने केला आहे. ही टीव्ही डीजे सबवुफरसोबत येते ज्याचा साउंड आउटपूट १०४ वॉट आहे. ग्राहकांना दमदार आवाज देण्याच्या हेतू यामागे असेल.

(फ्लिपकार्ट सेलमध्ये google pixel 6a ५ जी फोनवर मिळणार ९ हजार रुपयांची सूट, ‘हे’ केल्यास आणखी ६५०० रुपये वाचतील)

जाणून घ्या किंमत

Vu Glo LED TV च्या ५० इंच व्हेरिएंटची किंमत कंपनीच्या संकेतस्थळावर ३३ हजार ९९९ रुपये, ५५ इंच मॉडेलची किंमत ३८ हजार ९९९ रुपये आणि ६५ इंच मॉडेलची किंमत ५७ हजार ९९९ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. येत्या काळात ४३ इंच मॉडेल देखील येण्याची शक्यता आहे. तिन्ही टीव्हीमध्ये अल्ट्रा एचडी ३८४०x२१६० पिक्सेल एलइडी स्क्रिन आहे. तिन्ही टीव्ही फ्लिपकार्ट सेलसाठी उपलब्ध आहेत. या टीव्ही खरेदी करताना तुम्हाला एकस्ट्रा डिस्काउंट आणि बँक ऑफर्स मिळण्याची देखील शक्यता आहे.

Vu Glo LED TV चे फीचर

व्हीयू ग्लोएलइडी टीव्ही सिरीजच्या सर्व टीव्हीमध्ये अल्ट्रा एचडी एलइडी स्क्रिन आहे. टीव्हीमध्ये एआई ग्लो पिक्चर प्रोसेसर आहे. टीव्हीमध्ये एक साउंड सिस्टीम आहे, ज्यात १०४ वॉटच्या आउटपूसह एक इन बिल्ट सबवूफर आहे. हे टीव्ही अँड्रॉइड टीव्ही सॉफ्टवेअरवर चालतात. या टीव्हीमध्ये नवा गुगल टीव्ही इंटरफेस आहे. अ‍ॅप्स आणि अ‍ॅप डेटासाठी टीव्हीमध्ये २ जीबीची रॅम आणि १६ जीबीची स्टोरेज आहे, तसेच हन्ड फ्री गुगल असिस्टेंट एक्सेस, क्रिकेटसाठी क्रिकेट मोड आहे.

(One plus 11 pro मध्ये असणार हटके कॅमेरा आणि दमदार फीचर; पाहा लिक डिझाईन)

गेमर्ससाठी पण टीव्हीमध्ये काही महत्वाचे फीचर्स आहे. टीव्हीमध्ये डॉल्बी व्हिजन आणि एचडीआरी १० हाइ डायनामिक रेज फॉर्मेटसोबत वेरिएबल रिफ्रेश रेट आणि ऑटो लो – लॅटेन्सी मोडसाठी देखील सपोर्ट आहे, जे गेमिंगच्या कामी येऊ शकते.