Instagram AR Filters: इन्स्टाग्राम हे सध्याचे सर्वाधिक वापर असलेले सोशल मीडिया अ‍ॅप आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या अ‍ॅपच्या वापरकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळते. सुरुवातीला फक्त फोटो शेअर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या साइटचा वापर अनेक कारणांसाठी केला जात आहे. यात फोटो, व्हिडीओ यांव्यतिरिक्त अन्य फीचर्स देखील जोडण्यात आले आहेत. बरेचसे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स इन्स्टाग्रामवर कन्टेंट तयार करुन पैसे देखील कमवतात. या अ‍ॅपमध्ये नुकतेच एआर फिल्टर (AR – Augmented Reality) हे नवे फीचर जोडण्यात येणार आहे.

Instagram AR Filters म्हणजे काय?

इन्स्टाग्राम एआर फिल्टर्स वापरकर्त्यांच्या रियल-टाइम इमेजेस किंवा व्हिडीओज जोडण्यास मदत करते. या फिल्टर्सचा वापर करुन नॉर्मल फोटो घेत असताना त्यात व्हिज्युअल इफेक्टचा उपयोग करणे शक्य होणार आहे. ही सेवा इन्स्टाग्राम स्टोरी आणि रील व्हिडीओ यांमध्ये उपलब्ध असणार आहे. या फिल्टर्सच्या वापराने व्हिडीओ जास्त आकर्षक बनतात. फोटोच्या फोरग्राउंड किंवा बॅकग्राउंडवर काल्पनिक लेअर जोडण्यासाठी एआर फिल्टर्सची मदत होते. सेल्फी आणि बॅक अशा दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये व्हिडीओ/ फोटो काढताना हे फीचर वापरता येते. हे फील्टर वापरुन तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरु शकता.

How to pick the best AC types cooling capacities BEE star ratings and more you know while purchasing AC
थंडगार हवा अन् वीज बचत दोन्ही हवंय? मग AC खरेदी करताना ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष; पैशांची होणार मोठी बचत
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
how to choose right sports bra these small 6 tips can help you find correct fitting
जिमसाठी पहिल्यांदाच स्पोर्ट्स ब्रा खरेदी करताय? मग ‘या’ सहा गोष्टींची काळजी घ्या

आणखी वाचा – रंगोत्सवाचा आनंद लुटताना स्मार्टफोन खराब होण्याची भीती वाटतेयं? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरा फोन राहिल सुरक्षित

Instagram AR Filters कसे वापरावे?

  • स्मार्टफोनमध्ये इन्स्टाग्राम अ‍ॅप उघडा. होम पेजवरुन डावीकडे स्वाइप करा.
  • तेथे “Your Story” दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • पुढे उजवीकडे स्वाइप करा. तेथे मेग्निफाइन ग्लासचे (भिंग) चिन्ह दिसेल.
  • त्यावर जाऊन तेथे असलेल्या “Browse Effects” हे ऑप्शन निवडा.
  • यामध्ये वेगवेगळे इफेक्ट्स पाहायला मिळतील. येथील तुम्हाला आवडलेले फिल्टर निवडा.
  • तेथे दिलेल्या ‘Use’ बटणावर क्लिक करुन त्या विशिष्ट फिल्टरमध्ये स्टोरी किंवा रिल्स तयार करता येतात.

जर तुमच्या मित्राने एखाद्या एआर फिल्टरचा वापर करुन इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली असेल, तर त्यावरुन तुम्ही सुद्धा ते फिल्टर निवडू शकता. त्यासाठी तेथे लिहिलेल्या “Test It” पर्यायावर टॅप करावे लागेल. याशिवाय तुम्ही स्वत: फिल्टर देखील तयार करु शकता आणि इतरांनाही पाठवू शकता.

आणखी वाचा – लवकरच लॉन्च होणार आहेत Appleचे ‘हे’ भन्नाट प्रॉडक्ट्स; वापरकर्त्यांना अनुभवता येणार नवे फीचर्स, किंमत आहे…

इन्स्टाग्राम पोस्टवर फिल्टर वापरण्यासाठीच्या सोप्या स्टेप्स:

  • एखादा फोटो किंवा व्हिडीओ काढल्यांनतर किंवा अपलोड केल्यानंतर फिल्टर लावून तो एडिट करता येतो.
  • फोटो पोस्ट करताना Arrow या बटणावर टॅप करा, त्यानंतर इफेक्ट्स ऑप्शनवर क्लिक करा.
  • यामुळे तुम्हाला ठराविक फिल्टर निवडता येईल. त्यात बदल करायचा असल्यास त्या बटणावर पुन्हा टॅप करावे.
  • मनाप्रमाणे एडिट केल्यानंतर फोटो सेव्ह करा. कॅप्शन आणि लोकेशन जोडून नेक्स्ट (Next) बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर फोटोसाठी Done आणि व्हिडीओसाठी Share या ऑप्शन्सवर टॅप करा.