लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्सपैकी एक असणाऱ्या नेटफ्लिक्सने नुकतेच एक नवे फीचर रोलआऊट केले आहे. याचे नाव ‘प्रोफाइल ट्रान्सफर फीचर’ असून नेटफ्लिक्स अकाउंट आणि त्यावरील तुमचा डेटा अधिक सुरक्षित करणे हे या फीचरचे उद्देश आहे. या फीचरद्वारे एका नवे नेटफ्लिक्स अकाउंट बनवले जाणार आहे. तुमच्या आधीच्या नेटफ्लिक्स अकाउंटवरून सहजरित्या या नव्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करता येणार आहे. यामध्ये आधीच्या अकाउंटचे रेकमेंडेशन, हिस्ट्री, डाउनलोड केलेला कंटेन्ट, माय लिस्ट, सेटींग्स, सेव्हड गेम्स सर्व काही तसेच उपलब्ध होणार आहे. कसे वापरायचे हे फीचर जाणून घ्या.

प्रोफाइल ट्रान्सफर फीचरसाठी वापरा या स्टेप्स

  • प्रोफाइल ट्रान्सफर फीचर अनेबल करण्यासाठी तुमच्या नेटफ्लिक्स अकाउंटमधील होमपेज उघडा.
  • त्यामध्ये सेटींग्स पर्यायामधील पॅरेनटल कंट्रोल सेक्शनवर जा.
  • त्यानंतर ज्या अकाउंटवर नवे अकाउंट ट्रांसफर करायचे आहे ते निवडा.
  • ट्रान्सफर प्रोफाईल सेक्शनमध्ये ट्रान्सफर लिंक शेअर करा.
  • तिथे नवा ईमेल ॲड्रेस, पासवर्ड टाका ज्याचा वापर नव्या नेटफ्लिक्स अकाउंटसाठी करू इच्छिता.
  • नवे अकाउंट सेटअप करण्यासाठी ऑन स्क्रिन गाईड फॉलो करा. अशाप्रकारे प्रोफाइल ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण होईल.