व्हर्च्युअल रॅम, एक्सपांडेबल रॅम किंवा रॅम विस्तार तंत्रज्ञान हे शब्द नक्कीच तुमच्या ऐकण्यात आले असतील. हे शब्द बोलण्यात किंवा वाचण्यात वेगळे वाटतं असले तरी ह्या सर्वांचा अर्थ एकच आहे. तुम्ही मोबाईल फोन्सच्या जाहिरातींमध्ये किंवा बातम्यांमध्ये ऐकले असेल की असा स्मार्टफोन ८ जीबी रॅमवर ​​लॉन्च करण्यात आला आहे पण तो १३ जीबी रॅमपर्यंत परफॉर्मन्स देईल. या जास्त मिळणाऱ्या ५ जीबी पॉवरला व्हर्च्युअल रॅम किंवा एक्सपांडेबल रॅम असं म्हणतात. आज जवळजवळ सर्व स्मार्टफोन ब्रँड त्यांचे मोबाईल फोन रॅम विस्तार तंत्रज्ञानाने सुसज्ज करून लॉन्च करत आहेत. तर जाणून घेऊया व्हर्च्युअल रॅम म्हणजे काय आणि ती कशा प्रकारे कार्य करते. तसेच स्मार्टफोनमध्ये व्हर्च्युअल रॅम असण्याचे फायदे काय आहेत.

RAM म्हणजे काय ?

मोबाईल फोनमध्ये एखादे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केले जाते तेव्हा ते इंटर्नल मेमरीमध्ये स्टोर केले जाते आणि जेव्हा ॲप उघडले किंवा चालवले जातात तेव्हा त्यासाठी रॅमचा वापर केला जातो. म्हणजे जे काही ॲप चालेल ते रॅम मेमरीवर चालेल. एका ॲपवर काम करत असताना अचानक दुसरे ॲप उघडणे आणि नंतर टास्क आणि मल्टीटास्किंग स्विच करणे हे फोनच्या रॅमद्वारेच हाताळले जाते.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
License refused for lack of parking facility The High Court said there is no such rule
पार्किंगची सोय नाही म्हणून परवाना नाकारला, उच्च न्यायालय म्हणाले, असा काही नियम नाही…
Sensex jump over 500 point to hit
सेन्सेक्सची पाच शतकी दौड

Virtual RAM म्हणजे काय ?

फोनमध्ये जितकी जास्त रॅम मेमरी असेल तितकी जास्त जागा मल्टीटास्किंगसाठी मिळेल आणि सर्व प्रकारची कामे सुरळीतपणे चालतील. आजकाल हेवी गेम्स आणि मोठमोठे ॲप येत आहेत ज्यांना काम करण्यासाठी जास्त जागा लागते आणि त्यांच्या सिस्टम फाइल्सही मोठ्या आहेत. व्हर्च्युअल रॅम तंत्रज्ञानाचा वापर अशा अनेक ऍप्लिकेशन्सना भरपूर मेमरी देण्यासाठी केला जातो, जे आवश्यकतेनुसार फोनच्या अंतर्गत स्टोरेजचा वापर त्याच्या प्रक्रियेसाठी करतात.

मोबाईल फोनमध्ये Virtual RAM कशी कार्य करते ?

आतापर्यंत तुम्हाला समजले असेल की व्हर्च्युअल रॅममध्ये फोनच्या अंतर्गत स्टोरेजचाही समावेश होतो. स्मार्टफोन ब्रँड्स, फोन बाजारात आणताना, त्याच्या अंतर्गत स्टोरेजचा काही भाग व्हर्च्युअल रॅमसाठी राखून ठेवतात. हा भाग फोनमध्ये सेव्ह केलेल्या फोटो, व्हिडिओ आणि इतर फाइल्समध्ये कामी येत नाही. जेव्हा फोनमध्ये असलेली रॅम काम करत असताना कमी होऊ लागते, तेव्हा प्रक्रिया सुरळीत आणि जलद ठेवण्यासाठी, अंतर्गत स्टोरेजचा तो भाग रॅम आणि त्या विस्तारित रॅम किंवा व्हर्च्युअल रॅम मेमरीवर चालत असलेल्या ॲपसह एकत्रितपणे कार्य करण्यास सुरवात करतो.

Virtual RAM चे फायदे

स्मार्टफोनवर एकावेळी होणारी सर्व कामे रॅम मेमरीवर केली जातात. व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करणे, इन्स्टाग्राम , फेसबुकवर फीड स्क्रोल करणे आणि यूट्यूबवर व्हिडिओ स्क्रोल करणे ते फोनवर गेम खेळणे किंवा कनेक्ट करणे आणि कॉल प्राप्त करणे, हे सर्व रॅमद्वारे होते. जर फोनमध्ये पुरेशी रॅम असेल तर तुम्ही ही सर्व कामे एकाच वेळी स्मार्टफोनमध्ये करू शकता. व्हर्च्युअल रॅम अंतर्गत मेमरी वापरून रॅमची क्षमता वाढवते आणि सर्व ॲप आणि टास्क बॅकग्राउंडमध्ये चालत राहतात. त्यामुळे तुमचा फोन टास्क न थांबता, हँग न होता चालत राहतो .