भारतात व्हॉट्सअ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय मॅसेजिंग अ‍ॅप आहे. या माध्यमातून संवाद साधणं सर्वात सोपं समजलं जातं. त्यामुळे या अ‍ॅपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी ग्लोबल ऑडीओ प्लेअर फीचर आणत आहे. यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉप यूजर्स त्याच चॅट विंडोमध्ये असताना व्हॉइस प्लेयरला थांबवू किंवा प्ले करू शकत होते. आता नवं अपडेट डेस्कटॉप वापरकर्त्यांना व्हॉइस संदेश ऐकताना चॅट दरम्यान इतर गोष्टी करण्याची परवानगी देखील देणार आहे. यूजर्स चॅट्समध्ये स्विच करू शकतात आणि एकाच वेळी ऑडिओ नोट्स ऐकू शकतात. व्हॉइस मेसेज ऐकत असताना यूजर्स दुसऱ्या विंडोवर जाऊ शकतात. हे वैशिष्ट्य बीटामध्ये आणले जात आहे आणि लवकरच तुमच्या डेस्कटॉप अ‍ॅप्लिकेशनवर आणले जाईल. यूजर्संना चॅट आणि व्हॉईस प्लेअरवर सहजपणे नियंत्रण आणि ऐकण्याची अनुमती देईल.यामुळे चॅट करताना वेळोवेळी परत जाण्याच्या त्रासातूनही सुटका होईल.

व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीनतम वैशिष्ट्याचा मागोवा घेणारी वेबसाइट WABetaInfo द्वारे याची माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपने अँड्रॉइड यूजर्ससाठी जारी केले होते. यासोबतच कंपनी अशा फीचरवर काम करत आहे ज्यामुळे व्हॉईस मेसेज पाठवण्याआधी त्याचे पूर्वावलोकन करता येईल. तुम्ही प्रथम व्हॉइस मेसेज ऐकू शकता आणि त्यानुसार ते (Edit) संपादित करू शकता.

Developed an innovative method to diagnose Parkinson in the first stage Mumbai
मुंबई: कंपवाताचे पूर्वनिदान करता येणार
Pune city leads the country in house sales Pune news
घरांच्या विक्रीत देशात पुण्याची आघाडी! जाणून घ्या शहरातील कोणत्या भागाला सर्वाधिक पसंती…
how much Rihanna charges to perform at a private event (1)
रिहाना एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेते? अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगमध्ये करणार परफॉर्म
Renovation of Afghan War Memorial Church completed Mumbai
अफगाण वॉर मेमोरियल चर्चचे नूतनीकरण पूर्ण; ३ मार्चपासून सर्वांसाठी खुले होणार, नूतनीकरणासाठी १४ कोटींचा खर्च

JioPhone Next नंतर आता JioBook लॅपटॉपबाबत उत्सुकता; डिटेल्स झाले लीक

रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअ‍ॅप लवकरच Delete For Everyone फीचरची वेळ मर्यादा वाढवू शकते. अ‍ॅप वेळ मर्यादा दोन दिवसांपर्यंत वाढवू शकते. आधीच्या रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की व्हॉट्सअ‍ॅप या फीचरची वेळ मर्यादा एका आठवड्याने वाढवण्याचा विचार करत आहे. यासोबतच व्हॉट्सअ‍ॅप इतरही अनेक फीचर्सवर काम करत आहे. अ‍ॅपचे iMessage सारखे फीचर स्पॉट केले गेले आहे, ज्याच्या मदतीने यूजर्स संदेशावर प्रतिक्रिया देऊ शकतील. हे वैशिष्ट्य Android आणि iOS च्या आगामी अपडेटमध्ये जोडले जाऊ शकते.