whatsapp ban 23 lack accounts in india : व्हॉट्सअ‍ॅपने ऑक्टोबर महिन्यात भारतातील २३.२४ लाख खाती बंद केली आहेत. हा आकडा सप्टेंबरच्या आकड्यापेक्षा कमी आहे. सप्टेंबरमध्ये व्हॉट्सअ‍ॅपने २६.८५ लाख खाती बंद केली होती. त्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात १३ टक्क्यांची घट दिसून आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१ ऑक्टोबर २०२२ आणि ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान २३ लाख २४ हजार व्हॉट्सअ‍ॅप खाती बंद करण्यात आली आहेत. ८ लाख ११ हजार खात्यांवर युजरकडून तक्रार येण्यापूर्वीच बंदी घालण्यात आली, असे व्हॉट्सअ‍ॅपने ऑक्टोबर महिन्यासाठीच्या माहिती तंत्रज्ञान नियम २०२१ अंतर्गत येणाऱ्या भारतीय मासिक अहवालात म्हटले आहे.

(‘INFINIX’ने लाँच केला सर्वात स्वस्त 5G फोन, किंमत १२ हजारांच्या आत, फोनमध्ये ५० एमपी कॅमेरा)

गेल्या वर्षी अमलात आलेल्या सक्त आयटी नियमांमुळे मोठ्या डिजिटल प्लाटफॉर्म्सना (५० लाखांपेक्षा अधिक युजर्स असलेले) दर महिन्याला अनुपालन अहवाल प्रकाशित करणे सक्तीचे झाले आहे. यामध्ये डिजिटल प्लाटफॉर्म्सना तक्रारी आणि त्यावर केलेली कारवाई याची माहिती द्यावी लागते.

मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांनी त्यांच्या प्लाटफॉर्मवर प्रसारित होणार्‍या द्वेषयुक्त भाषण, चुकीची माहिती आणि खोट्या बातम्यांबद्दल भूतकाळात टीका केली आहे. तर, डिजिटल प्लाटफॉर्म्सनी अनियंत्रितपणे कंटेंट हटवणे आणि वापरकर्त्यांवर बंदी घालणे यावर काही घटकांनी चिंता व्यक्त केली आहे.

(७ हजारांच्या आत मिळवा ‘हा’ ३२ इंच टीव्ही, अमेझॉनवर मिळत आहे मोठी सूट)

या पार्श्वभूमीवर सरकारने गेल्या आठवड्यात तक्रार अपील यंत्रणा स्थापन करण्यासाठी काही नियम जाहीर केले होते. व्हॉट्सअ‍ॅपच्या ताज्या अहवालानुसार, सप्टेंबरमध्ये यंत्रणेकडे ७०१ तक्रारी आल्या, परंतु केवळ ३४ विरुद्धच कारवाई करण्यात आली आहे. यंत्रणेला ५५० खाती बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते, मात्र केवळ ३४ खात्यांवरच कारवाई झाली.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp ban 23 lack accounts in india in october month ssb
First published on: 02-12-2022 at 10:44 IST