WhatsApp: IT नियम 2021 अंतर्गत, WhatsApp दर महिन्याला मासिक सुरक्षा अहवाल( Monthly Sefty Report) जारी करते. कंपनीने एप्रिल महिन्याचा अहवालही प्रसिद्ध केला होता. १ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान व्हॉट्सअॅपने ७४ लाख भारतीय अकाउंट्सवर बॅन केले आहेत. हे सर्व अकाउंट्स नवीन आयटी नियमाचे पालन करत नव्हते म्हणजेच हे अकाउंटस् कोणत्या कोणत्या स्वरुपात प्लॅटफॉर्मवर चुकीच्या गोष्टींमध्ये सहभागी होते. बँन केलेल्या अकाउंट्सपैकी कंपनीने स्वत:हून २४ लाख अकाउंट्स कोणत्याही तक्रारीशिवाय बॅन केले आहेत. तुम्ही अॅपवर कोणत्याही चुकीच्या गोष्टीचा प्रचार करत असाल किंवा अशा गोष्टीमध्ये सहभाही असाल, तर तुमच्या अकाउटंसदेखील कंपनी बॅन करू शकते. तुम्ही या प्लॅटफॉर्मचा योग्य वापर करून कंपनीच्या नियमांचे पालन करणे शहाणपणाचे ठरेल. भारतात व्हॉट्सअॅपचे ५०० दशलक्षाहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत आणि आज प्रत्येकजण या अॅपद्वारे एकमेकांशी जोडलेला आहे. मार्च महिन्यामध्ये बॅन झाले इतके अकाउंट्स मागील महिन्यांनी ४५,९७,४०० अकाउंट्स बॅन केले केले होते ज्यापैकी १२,९८,०० अकाउंट्स कंपनीने कोणतीही तक्रार दाखल झालेली नसताना स्वत:हून बॅन केले आहेत. कंपनीकडे मार्चमध्ये ४७२० अकाउंट्सबाबत तक्रार आली होती ज्यापैकी ४,३१६ अकाऊंट बॅन केली होती आणि कंपनीमध्ये यापैकी ५५३ अकाउंट्स विरोधात कारवाई केली होती. हेही वाचा - नवरदेव होऊन घोड्यावर बसला एलॉन मस्क? शेरवानी लूक होतोय व्हायरल, पाहा फोटो हेही वाचा - चुकीच्या नंबरवर केला रीचार्ज? असे मिळवू शकता पैसे परत, जाणून घ्या तुमच्या फायद्याची गोष्ट नुकतेच लॉन्च झाले हे फीचर अॅपवर लोकांची प्रायव्हसी आणखी चांगली करण्यासाठी व्हॉटसअॅप नुकतेच चॅटलॉक फिचर ग्लोबली रोलआऊट केले आहे ज्याच्या मदतीने वापरकर्ते आपले चॅट आणखी सुरक्षित करू शकतात. चॅट लॉक फिचर वापरण्यासाठी तुम्हाला वापरकर्त्यांच्या प्रोफाईलला भेट द्यावी लागेल ज्यांचे चॅट तुम्हाला लपवायचे आहे ते फिंगरप्रिंटच्या मदतीने तुम्ही चॅटलॉकमध्ये टाकू शकता. चॅट लॉक केल्यानंतर एका वेगळ्या फोल्डरमध्ये जाईल आणि कोणीही हे चॅटसंबधीत अपडेट पाहू शकणार नाही. नोटिफिरेशन पॅनेलमध्येही या चॅटसंबधीत त्याला अपडेट दिसणार नाही. म्हणजेत तुमचे चॅट पुर्णपणे सुरक्षित असेल.