scorecardresearch

WhatsAppने महिलांना दिली अप्रतिम भेट! ‘Bol Behen’ चॅटबॉट करणार तरुण मुलींची मदत

कंपनीने भारतीय महिलांसाठी AI आधारित चॅटबॉट आणला आहे ज्याला ‘बोल बेहेन’ असे नाव देण्यात आले आहे.

WhatsApp Bol Behen chatbot
प्रातिनिधिक फोटो

Whatsapp Bol Behen Chatbot: इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी वेळोवेळी काहीतरी नवीन आणत असत. पण यावेळी कंपनीने खासकरून आपल्या महिला वापरकर्त्यांना लक्षात घेऊन एक अतिशय खास फीचर सादर करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने भारतीय महिलांसाठी AI आधारित चॅटबॉट आणला आहे ज्याला ‘बोल बेहेन’ असे नाव देण्यात आले आहे. यासाठी कंपनीने ‘नॉन-प्रॉफिट गर्ल इफेक्ट’ सोबत भागीदारी केली आहे.

कसं असेल हे चॅटबॉट?

नॉन-प्रॉफिट गर्ल इफेक्टसोबत भागीदारी केल्यानंतर, व्हॉट्सअॅपने भारतीय महिला आणि तरुण मुलींसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित चॅटबॉट ‘बोल बेहेन’ लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या चॅटबॉटवर महिलांना आरोग्यविषयक माहिती मिळणार आहे. एवढेच नाही तर या चॅट फॉरमॅटची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, महिलांना आरोग्य, लैंगिकता आणि नातेसंबंध या विषयांची माहिती येथे मिळू शकेल. हा चॅटबॉट हिंग्लिश म्हणजेच इंग्रजी आणि हिंदी भाषेच्या मिश्रणाने तयार करण्यात आला आहे.

(हे ही वाचा: तुमच्या फोनमध्येही इंटरनेट आणि नेटवर्कच्या समस्या येतात? घरातल्या ‘या’ गोष्टी असू शकतात कारण)

‘या’ नंबरवर पाठवा मेसेज

तुम्हालाही बोल बेहेन चॅटबॉट वापरून कोणतीही माहिती मिळवायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला +९१-७३०४४९६६०१ हा नंबर सेव्ह करावा लागेल. त्यानंतर या नंबरवर Hi चा संदेश पाठवावा लागेल. विशेषत: भारतातील हिंदी पट्ट्यातील किशोरवयीन मुली आणि महिलांना लक्षात घेऊन हा चॅटबॉट सादर करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. जे सहसा लोडेड एंड स्मार्टफोन वापरतात. याद्वारे महिलांना अनेक महत्त्वाची माहिती मिळू शकणार आहे.

(हे ही वाचा: Internet Speed Test कशी करायची? Google वर लिहा फक्त ‘हे’ ३ शब्द)

चॅटबॉट कसं करते काम?

व्हॉट्सअॅपवर बोल बेहेन चॅटबॉट मर्यादित वापरकर्त्यांसाठी सादर करण्यात आला आहे आणि ते सध्या फक्त बीटा आवृत्तीवर वापरला जाऊ शकते. चांगली गोष्ट म्हणजे बोल बेहेन चॅटबॉट मोबाईल आणि वेब दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध असेल. ते वापरण्यासाठी चॅटबॉकचा नंबर सेव्ह केल्यानंतर त्या नंबरवर हायचा मेसेज पाठवावा लागेल. ज्यानंतर उत्तर येताच तुम्हाला महिलांशी संबंधित कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळू शकते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Whatsapp bol behen chatbot to take care of young girls well being ttg

ताज्या बातम्या