व्हॉट्सअ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅप आहे. इतर सोशल मीडियाच्या या माध्यमातून सर्वाधिक मॅसेज पाठवले जातात. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप टप्प्याटप्प्याने नवे फिचर्स युजर्ससाठी आणते. नुकतंच व्हॉट्सअ‍ॅपने पेमेंट फिचर सुरु केलं आहे. या माध्यमातून पैशांचा व्यवहार करता येतो. आता व्हॉट्सअ‍ॅपने नवं फिचर युजर्ससाठी आणलं आहे. आता खास कॉन्टक्ट नंबरला आवडती रिंगटोन ठेवता येणार आहे. त्यामुळे शेकडो मॅसेज जरी आले तरी मोबाईल न बघता आपल्या प्रिय व्यक्तीचा मॅसेज आला हे रिंगटोनवरून कळणार आहे.

अशी सेट करा रिंगटोन

son in law dance for his father in law video goes viral on social media
“है घर, है पैसा, है गाडी..” जावयाने केला सासऱ्यासाठी भन्नाट डान्स, Viral Video एकदा पाहाच
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
live-in partner killed and hung the body on tree
नागपूर : खून करून झाडाला लटकवला मृतदेह, लिव्ह इन पार्टनरचा बनाव…
Bengaluru woman slammed for phone
स्कुटर चालवताना मोबाईलवर बोलण्यासाठी काकूंचा हटके जुगाड! व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच
  • सर्वप्रथम तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप ओपन करावे लागेल.
  • ज्या कॉन्टॅक्टची रिंगटोन तुम्हाला सेट करायची आहे त्याचं चॅट उघडा.
  • चॅट ओपन केल्यावर तुम्हाला उजव्या बाजूला तीन ठिपके दिसतील.
  • तीन डॉट्सच्या पर्यायावर क्लिक करा, येथे तुम्हाला View पर्याय दिसेल.
  • View पर्यायावर क्लिक करा, येथे तुम्हाला नोटिफिकेशनचा पर्याय दिसेल.
  • नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला कस्टम नोटिफिकेशनचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • कस्टम नोटिफिकशनच्या चेक बॉक्सवर टिक करा.
  • तुम्ही या पर्यायावर टिक करताच तुम्ही तुमच्या फोनमधील रिंगटोन निवडू शकता.
  • हा पर्याय वापरून तुम्ही विशिष्ट संपर्कासाठी तुम्हाला हवी असलेली कोणतीही रिंगटोन सेट करू शकता.
  • याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कोणत्याही ग्रुपची रिंगटोन बदलू शकता.

या फीचरचा वापर करून तुम्ही फोन पुन्हा पुन्हा न उचलता फक्त नोटिफिकेशनच्या आवाजाने संपर्क ओळखू शकता. तुम्ही ऑफिसचा ग्रुप वेगळे करण्यासाठी देखील हे करू शकता.