WhatsApp Update : मेटा मालकीच्या व्हॉट्सऍपने आपल्या ग्राहकांसाठी नवीन अपडेट आणलं आहे. ज्यामध्ये तुम्ही व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये दुप्पट सदस्य जोडू शकता. नवीन अपडेटमध्ये ५१२ समस्यांना जोडण्याची अनुमती असेल. सध्या ही मर्यादा २५६ सदस्यांपर्यंत कार्यरत आहे. डब्लूएबीटाइन्फोच्या अहवालानुसार, मेटा मालकीने हे वैशिष्ट्य व्हॉट्सऍपच्या अँड्रॉइड , आयओएस आणि डेक्सटॉप आधारित ॲप्सच्या बीटा आवृत्तीवर आणले आहे. एका ग्रुपमध्ये ५१२ पर्यंत सदस्य जोडण्याची क्षमता हे एकमेव अपडेट नाही तर अलीकडच्या काळात त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अनेक अपडेट आणली आहेत. कंपनीने मेसेज रिएक्शन आणि एकावेळी २ जीबी पर्यंत फाइल शेअर करण्याची क्षमता यासारखी वैशिष्ट्ये देखील आणली आहेत. यापूर्वी, व्हॉट्सऍप वापरकर्ते फक्त १०० एमबी पर्यंत फाइल्स शेअर करू शकत होते.

कसे तपासाल ?

१) जर तुम्हाला ५१२ पर्यंत सदस्य जोडू शकण्याची , कार्यक्षमता प्राप्त झाली आहे का हे तपासायचे असल्यास , नवीन गट पर्यायावर टॅप करून नवीन गट तयार करण्याचा प्रयत्न करा.

Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
journalism fellowships scholarships in journalism fellowship for the future of journalism
स्कॉलरशीप फेलोशिप : पत्रकारांसाठी फेलोशिप
Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

२) खालील स्क्रीन तुम्हाला तुमच्या सर्व व्हॉट्सऍप सदस्यांची यादी दाखवेल ज्यांना ग्रुपमध्ये ॲड करता येईल.

३) हीच स्क्रीन तुम्हाला ग्रुपमध्ये जोडल्या जाऊ शकणार्‍या सहभागींची एकूण संख्या देखील दाखवेल.

४) यासाठी आयओएसवर व्हॉट्सऍप अपडेट करण्यासाठी, ॲपवर जा, व्हॉट्सऍप टाइप करा आणि अपडेट ऑप्शनवर दाबा.

५) तुम्ही अँड्रॉइड फोनसाठीही अशीच युक्ती वापरू शकता.

६) व्हॉट्सऍप डेस्कटॉपवर ॲपचे न्यू व्हर्जन मिळविण्यासाठी, मायक्रोसॉफ्ट स्टोअरवर जा, व्हॉट्सऍप टाईप करा आणि नंतर अपडेट बटण दाबा.