Whatsapp New Update: तुम्ही एखाद्याशी काही दिवसांपूर्वी चॅट केले असते आणि मग काही दिवसांनी पुन्हा बोलताना ती मंडळी स्वतःच्या वाक्यावरून पलटी मारतात, अशावेळी त्यांच्या बोलण्याचा संदर्भ पटवून देण्यासाठी एखादा स्क्रिनशॉट असेल तर तुमचं काम सहज होतं. पण असे किती स्क्रिनशॉट आपण काढत बसणार? दुसरीकडे चॅट स्क्रोल करून मॅसेज शोधायचे तरी बोटांना विनाकारण त्रास आहेच. या सगळ्यावर व्हॉट्सअॅपने एक नामी उपाय आणला आहे.

अलीकडेच व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांसाठी प्लॅटफॉर्मवर UPI पेमेंटची सुविधा आणल्यावर आता लवकरच एक नवे फीचर समोर येणार आहे. WABetaInfo च्या पोस्टनुसार, व्हॉट्सअॅप लवकरच आयओएस वापरकर्त्यांना विशिष्ट तारखेचा मॅसेज शोधता येणार आहे.

Prepaid Recharge Plans: दिवसाला ५ जीबी डेटा, रात्रभर अनलिमिटेड इंटरनेट, फ्री कॉलिंग; आणि किंमत फक्त…

व्हॉट्सअॅप नवे फीचर कसे वापरता येणार?

व्हॉट्सअॅपच्या नव्या अपडेटमध्ये एक कॅलेंडर चिन्ह होम पेजवर पाहायला मिळते. ज्यावर क्लिक करून तुम्ही चॅट्स मध्ये विशिष्ट संदेश त्या तारखेनुसार शोधू शकता. बटणावर क्लिक केल्याने एक कॅलेंडर दृश्य उघडेल जेथे वापरकर्ते तारीख निवडू शकतील. तुम्ही कॅलेंडर दृश्य बंद करू इच्छित असल्यास, फक्त चॅट स्क्रोल करताच हा आयकॉन बाजूला अदृश्य होईल. टेस्टफ्लाइटच्या iOS 22.0.19.73 अपडेटसाठी व्हॉट्सअॅप बीटावर सध्या हे वैशिष्ट्य उपलब्ध आहे.

लक्षात ठेवा की तुम्हाला नवीनतम व्हॉट्सअॅप वैशिष्ट्ये वापरायची असल्यास तुम्हाला बीटासाठी साइन अप करावे लागेल. या वर्षी जुलैमध्ये, मेटाच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मने २. ४ दशलक्षाहून अधिक भारतीय खात्यांवर बंदी घातली. तसेच, WhatsApp यापुढे iOS 10 आणि iOS 11 वर असलेल्या अनेक iPhone मॉडेल्सवर काम करणार नाही अशीही माहिती समोर येत आहे.

याशिवाय, व्हॉट्सअॅप सर्व्हे नावाचे एक नवीन फीचर सुद्धा लवकरच लाँच केले जाण्याची शक्यता आहे. WaBetaInfoच्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप लवकरच वापरकर्त्यांना अॅपमध्येच फीडबॅक विचारू शकतो. या अॅप-मधील सर्वेक्षणांमध्ये सहभागी होऊन, आमंत्रण मिळाल्यानंतर वापरकर्ते नवीन वैशिष्ट्ये, उत्पादने याबद्दल त्यांचा अभिप्राय देऊ शकतात. वापरकर्त्यांना त्यांचे अभिप्राय सबमिट करण्यासाठी आमंत्रणे प्राप्त होतील. यावरून येत्या वापरकर्त्यांच्या नवनवीन मागण्या व तक्रारी प्राधान्याने सोडवण्यास मदत होऊ शकते.