WhatsApp Web Beta Program: व्हॉट्सअ‍ॅप मोबाईल प्रमाणेच व्हॉट्सअ‍ॅपवेब वापरणाऱ्यांची संख्या देखील खूप आहे. अशात कंपनी व्हॉट्सअ‍ॅप वेबसाठी देखील काहीतरी नवीन देण्याच्या तयारीत आहे.  आपणा सर्वांना माहित आहे की, कोणतेही नवीन वैशिष्ट्य आणण्यापूर्वी, मेटा काही बीटा परीक्षकांसाठी ते रिलीज करते. WhatsApp बीटा पर्याय मोबाईल आणि डेस्कटॉप दोन्हीवर उपलब्ध आहे आणि बीटा परीक्षकांना सर्व आगामी नवीन वैशिष्ट्ये प्रथम मिळतात. आता लवकरच वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅप वेबवरही व्हॉट्सअ‍ॅप वेब बीटा’चा पर्याय मिळेल. म्हणजेच, वेब वापरकर्ते देखील बीटा प्रोग्रामसाठी अर्ज करू शकतील आणि कंपनीला त्यांच्याशी संबंधित सर्व नवीन वैशिष्ट्यांची आणि फीडबॅकची माहिती देऊ शकतील.

‘हा’ आहे नवीन पर्याय

व्हॉट्सअ‍ॅपच्या डेव्हलपमेंटवर नजर ठेवणाऱ्या वेबसाइट wabetainfo नुसार, व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे जे वेब यूजर्सना हेल्प सेक्शन अंतर्गत ‘जॉइन बीटा’ नावाने मिळू लागले आहे. जर तुम्ही बीटा प्रोग्राममध्ये सामील झालात तर तुम्हाला प्रथम कंपनीकडून नवीन फीचर्स मिळतील, जसे बीटा वापरकर्त्यांना अ‍ॅप आणि डेस्कटॉपवर मिळतात. सध्या, कंपनीने WhatsApp वेब बीटा टेस्टर्ससाठी कोणती वैशिष्ट्ये ठेवली आहेत हे माहित नाही. किंवा कंपनी या युजर्सना कोणते फीचर्स देईल. पण आता बीटा ऑप्शन व्हॉट्सअ‍ॅप वेबवरही उपलब्ध असेल हे निश्चितच ठरले आहे. हे वैशिष्ट्य आणण्याचा उद्देश मेटाच्या सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांकडून योग्य अभिप्राय गोळा करणे हा आहे जेणेकरून रोलआउट वैशिष्ट्य अधिक चांगले आणि दोषमुक्त केले जाऊ शकते.

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
bombay hc declare sawantwadi dodamarg corridor as ecologically sensitive
अन्वयार्थ : पुन्हा कान टोचले; आता तरी सुधारा..
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : आता कोठे हरवली भाजपची नैतिकता?

(हे ही वाचा: Samsung, Oppo, Vivoच्या Foldable स्मार्टफोनचा गेम होणार? सर्वात स्वस्त फोल्डेबल फोन बाजारात दाखल, किंमत…)

WhatsApp वेब बीटा प्रोग्राम या आठवड्यात आणला गेला आहे, जो हळूहळू सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होत आहे.

‘या’ वैशिष्ट्यावरही काम सुरू

याशिवाय मेटा आणखी अनेक फीचर्सवर काम करत आहे. लवकरच लोकांना व्हॉट्सअ‍ॅपवर ‘चॅट लॉक’ फीचर मिळणार आहे, ज्यामुळे त्यांची गोपनीयता आणखी सुधारेल. या वैशिष्ट्याच्या मदतीने, वापरकर्ते पासकोड किंवा फिंगरप्रिंटसह वैयक्तिक चॅट लॉक करण्यास सक्षम असतील. त्याचप्रमाणे IOS वरही मेटा अनेक नवीन फीचर्स देण्याचा विचार करत आहे.