व्हाट्सअ‍ॅप हे मेटाच्या मालकीचे आहे. हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून याद्वारे आपण एकमेकांशी मेसेजद्वारे संवाद साधू शकतो. यामधून आपण एकमेकांना फोटो, व्हिडीओ शेअर करणे , व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल्स करू शकतो. व्हाट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स लाँच करत असते जेणेकरून वापरकर्त्यांना व्हाट्सअ‍ॅप वापरणे अजून सोपे व्हावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हाट्सअ‍ॅपने यावेळी आयफोन वापरकर्त्यांसाठी म्हणजे iOS साठी एक नवीन फीचर आणले आहे. हे फिचर आयओएस वापरकर्त्यांना अ‍ॅपल अ‍ॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. व्हाट्सअ‍ॅपने कोणते नवीन फीचर्स आणले आहे तसे कसे वापरावे कसे डाउनलोड करावे हे जाणून घेऊयात.

हेही वाचा : WhatsApp वर ‘लाईव्ह लोकेशन’ शेअर करायचे आहे?, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया

या नवीन फिचरमध्ये वापकर्ते आपल्या हव्या असलेल्या तारखेनुसार मेसेज शोधण्यास मदत करणार आहे. तसेच नवीन अपडेट हे वापरकर्त्यांना इतर अ‍ॅपमधील फोटो, व्हिडीओ आणि डॉक्युमेंट्स मेसेजिंग अ‍ॅपमध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करण्याची तसेच चॅट मेसेजमध्ये इतर व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसोबत शेअर करण्याची परवानगी देते. हे अपडेट आयफोन वापरकर्त्यांसाठी सुरु झाले असून लवकरच ते सर्व वापरकर्त्यांसाठी सुरु केले जाऊ शकते.

Step-1. Apple App स्टोअरवरून WhatsApp चे नवीन व्हर्जन डाउनलोड करा किंवा आयफोनवरील App अपडेट करा.

Step-2. तुमच्या iOS डिव्हाइसवर WhatsApp अॅप उघडा.

Step-3. या नंतर चॅट विंडोवॉर जाऊन ज्या तारखेचा मेसेज हवा आहे तो मेसेज शोधा.

Step-4. आता recipient नावावर क्लिक करा.

हेही वाचा : WhatsApp वरून पाठवता येणार ओरिजिनल क्वालिटीचे फोटोज; युजर्सना होणार फायदाच फायदा

Step-5. यानंतर Recipient च्या प्रोफाइल फोटो खाली सर्च बटण असेल त्यावर क्लिक करा.

Step-6. सर्च बारच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या कॅलेंडर बटणावर क्लिक करावे.

Step-7. आता मेसेज शोधण्यासाठी वर्ष आणि महिना सिलेक्ट करा.

तसेच व्हाट्सअ‍ॅप अक्खी एक नवीन फिचर आणायच्या विचारात आहे. जे वापरकर्त्यांना दुसर्यांना ब्लॉक करणे सोपे होईल. WABetaInfo च्या अहवालानुसार, मेसेजिंग अ‍ॅप वापरकर्त्यांना चॅट लिस्ट आणि नोटिफिकेशनद्वारे ब्लॉक करण्याचे फिचर अनंत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp launch a feature for iphone users to search for old messages by date tmb 01
First published on: 30-01-2023 at 08:09 IST