व्हॉट्सअ‍ॅपकडून आपल्या युजर्ससाठी रोज नवनवीन अपडेट्स जारी केले जातात. या अपडेट्समध्ये आता मल्टी- डिव्हाइस सपोर्ट फिचरची भर पडली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने अँड्रॉइडवरील सर्व बीटा युजर्ससाठी सध्याच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटला दुसऱ्या एका मोबाईलशी लिंक करण्यासाठी Companion Mode नावाचे फिचर लाँच केले आहे. हे फिचर ioS आणि Android युजर्ससाठी असेल.

या नव्या फिचरमुळे आता दोन मोबाईलवर एकचं WhatsApp अकाउंट वापरता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट सेकंडरी मोबाईल फोनशी लिंक केल्यानंतर युजर्स आपल्या मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅप चॅट पाहू शकणार आहेत. हे फिचर सुरुवातीला बीटा युजर्सच्या निवडक गटासाठी उपलब्ध होते. हे फिचर प्रथम नोव्हेंबर २०२२ मध्ये Android साठी WhatsApp बीटा चे प्रमुख अपडेट म्हणून सादर करण्यात आले होते.

irctc indian railways black box of indian railway crew voice video recording system cvvrs installed in trains loco engine
रेल्वेगाड्यांमध्येही आता विमानासारखी ‘ब्लॅक बॉक्स’ यंत्रणा, अपघात रोखण्यासाठी होईल उपयोग; वाचा
Watch this video before eating strawberries
स्ट्रॉबेरी खाण्याआधी हा व्हिडीओ एकदा बघाच! पुन्हा आयुष्यात कधीही खाणार नाही
Microsoft announced the removal of WordPad from Windows Here is What apps can you use instead Must Read
आता मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये दिसणार नाही वर्डपॅड! तुम्ही कोणत्या ॲप्सचा करू शकता उपयोग? पाहा यादी…
Viral Video chef Makes nostalgic Things and create a stationery set Pencil And Cutter From Chocolate
शेफने केले सर्वांनाच थक्क! चक्क खऱ्या पेन्सिल, कटरसारखा बनविला केक; पाहा VIDEO

आत्तापर्यंत सेकंडरी डिव्हाइज हे फक्त अँड्रॉइड फोनवरचं वापरता येत होते. पण युजर्स आता Android ला iPhones शी कनेक्ट करत त्याचा सेकंडरी डिव्हाइज म्हणून वापर करु शकतात. युजर्स त्यांनी लिंक केलेल्या दुसऱ्या मोबाईलवरूनही चॅट हिस्ट्री पाहू शकतात. पण सेकंडरी डिव्हाइसमधून अर्थात दुसऱ्या लिंक केलेल्या मोबाईलवरून युजर्स ब्रॉडकास्ट लिंक्स आणि स्टेटस अपडेट्स करू शकत नाहीत.

Android डिव्हाइसला लिंक करण्याच्या स्टेप्स

१) तुमच्या दुसऱ्या Android मोबाइल फोनवर, Google Play Store वरून WhatsApp Messenger किंवा WhatsApp Business चा नवीनतम बीटा डाउनलोड करा.

२) आता ज्या मोबाईलमध्ये प्रथम व्हॉट्सअ‍ॅप ओपन केलं त्यातील ओव्हरफ्लो मेनूवर टॅप करा आणि तुम्हाला शेवटी “लिंक ए डिव्हाइस” हे ऑप्शन दिसेल.

३) तुमच्या पहिल्या डिव्हाइसवर WhatsApp ओपन करा. आता सेटिंग्ज आणि लिंक केलेल्या डिव्हाइसेसकडे जा.

४) QR कोड कॅप्चर करण्यासाठी पहिल्या फोनवर तुमचा दुसऱ्या मोबाइलवर पकडा.

तुम्हाला दुसऱ्या मोबाईलमध्ये मोबाइल नंबर, OTP टाकण्याऐवजी तुम्ही जरी QR कोड स्कॅन केलात तरी तुम्ही तुमच्या WhatsApp अकाउंटवर जाऊ शकता.